मुक्तपीठ टीम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना २ हजारांच्या तीन हप्त्यामध्ये वर्षभरात सहा हजार रुपये सरकारतर्फे मिळतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शेवटचा हप्ता कोणत्याही क्षणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. म्हणून या योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील बदल सातत्याने तपासत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे योजनेतील बदल कसे तपासयाचे याची प्रक्रिया जाणून घेऊयात…
कसं तपासाल पीएम किसान निधीचं खातं?
- सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
- वेबसाइट ऑपन केल्यानंतर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
- यानंतर Beneficiary status पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यावर एक नवा पेज ऑपन होईल.
- त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका. त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल. येथे नोंदणीकृत शेतकरी त्यांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्त्याशिवाय अन्य माहिती मिळवू शकतात.
हा मेसेज दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही
वर नमूद केलेली माहिती प्रविष्ट केल्यानंतर स्मार्टफोन / संगणक स्क्रीनवर ‘एफटीओ जनरेटर अॅण्ड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग’ असे दिसून येईल. पण असे दिसल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण याचा अर्थ पंतप्रधान किसान सन्मान निधी हप्ता प्रक्रियेत आहे आणि तो लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल.