Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार

माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
दादाजी भुसे

 मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या संरक्षण दलातील सर्व माजी सैनिक आणि त्यांच्या विधवा पत्नींना ग्रामविकास आणि नगरविकास विभागामार्फत मालमत्ता करातून सूट देणारी  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राज्यात राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी परिणामकारकपणे करावी, असे निर्देश  माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

         

 या योजनेसंदर्भात आढावा घेण्यासाठी  भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाच्या सचिव सीमा व्यास, उपसचिव सरिता बांदेकर-देशमुख, नगरविकास, ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

       

 

भुसे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाने प्रभावीपणे करुन देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करावा. क्षेत्रियस्तरावर योजनेच्या अंमलबजावणीकरिता दोन्ही विभागांनी परिपत्रक तातडीने निर्गमित करावे. ग्रामविकास विभागामार्फत सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्र पाठवून योजनेचा लाभ देण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात. विभागीय आयुक्तांच्या बैठकीत देखील या योजनेचा आढावा घ्यावा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी देखील या योजनेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले.

           

 

राज्यातील ग्रामस्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत ग्रामविकास विभागाने ऑगस्ट 2020 मध्ये तर नगरविकास विभागाने सप्टेंबर 2020 मध्ये निर्णय घेतला. या दोन्ही विभागांच्या आदेशांचे एकत्रिकरण करुन  बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत नोव्हेंबर 2020 मध्ये स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात आला.


Tags: Balasaheb thackerayFormer Soldier Welfare Minister Dadaji Bhusemuktpeethबाळासाहेब ठाकरेमाजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसेमुक्तपीठ
Previous Post

पीएम किसान निधीचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना, असे तपासा खाते

Next Post

आहारची मुख्यमंत्र्यांकडे हॉटेल लायसन फीच्या माफीची मागणी

Next Post
आहारची मुख्यमंत्र्यांकडे हॉटेल लायसन फीच्या माफीची मागणी

आहारची मुख्यमंत्र्यांकडे हॉटेल लायसन फीच्या माफीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!