Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वदेशी ‘आयएनएस खुकरी’ ला भावपूर्ण निरोप, ३२ वर्षांची गौरवशाली सेवा

December 25, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष
0
ins khurki

मुक्तपीठ टीम

शत्रुंच्या नौकांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर तिचा खात्मा होणारच , असा दबदबा असलेली स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू ‘कॉर्व्हेट (नौका) आयएनएस खुकरी’ गुरुवारी, २३ डिसेंबर रोजी नौदल सेवेतून निवृत्त झाली.भारताच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात अहोरात्र तब्बल ३२ वर्षांची गौरवशाली सेवा केल्यानंतर तिला विशाखापट्टणम येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.

ती सेवेत असताना एकूण २८ कमांडिंग अधिका-यांनी ‘कमांड’ केले आणि तब्बल ६ लाख ४४ हजार ८९७  नॉटिकल मैलांपेक्षा जास्त अंतर पार केले. जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या ३० पट किंवा ३ पटीने संपूर्ण जगभर ‘ नॅव्हिगेट ’ करण्याइतके आहे.

ही नौका भारतीय भूदलाच्या गोरखा ब्रिगेडशी संलग्न होती आणि गोरखा ब्रिगेडचे (सेना मेडल) लेफ्टनंट जनरल पी. एन अनंतनारायण या निरोप समारंभाला उपस्थित होते.

ins khurki

२३ आॅगस्ट १९८९ रोजी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’नी या ‘कॉर्व्हेट’ची बांधणी केली होती. या ‘कॉर्व्हेट’ला नौदलाच्या पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मुख्यालयातंर्गत असलेल्या ‘फ्लीट्स’चा भाग असण्याचा मान मिळाला होता. विशेष म्हणजे, २३ आॅगस्ट ८९ रोजी या ‘कॉर्व्हेट’ची बांधणी झाली आणि याच तारखेला २३ डिसेंबर रोजी तिला निरोप देण्यात आला.
सूर्य अस्ताला जात असताना, काळोख पडण्यापूर्वी लढाऊ नौकेला समारंभपूर्वक भावपूर्ण निरोप देण्याचा भारतीय नौदलात रिवाज आहे. या समारंभावेळी भारताचा तिरंगा (राष्ट्रध्वज), नौदलाचाही ध्वज आणि ‘डी’कमिशनिंग पेनंट खाली उतरवण्यात येते. यावेळी संबंधित नौदल मुख्यालयांचे ध्वजाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि निवृत्त माजी कमांडिंग अधिकारी व संबंधित नौकेचे अधिकारी उपस्थित  असतात.

ins khurkiया समारंभावेळी पूर्व मुख्यालयाचे व्हाईस अ‍ॅडमिरल बिस्वजित दासगुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्यास्त होत असताना, नौदलाच्या रितीरीवाजाने ‘खुकरी’ला अ‍ॅडमिरल दासगुप्ता आणि संबंधित नौदल अधिका-यांनी समारंभपूर्वक निरोप दिला.

तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण चंद्र पंत यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारं•ाात ही ‘कॉर्व्हेट’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्या समारंभाला  दिवंगत कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांच्या पत्नी सुधा मुल्ला उपस्थित होत्या. आताचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल निवृत्त संजीव भसीन यांना या नौकेचे प्रथम ‘कमांडिंग अधिकारी ’(सीओ) म्हणून मान मिळाला होता.


Tags: Indian NavyINS KHUKRIआयएनएस खुकरी
Previous Post

“रश्मी शुक्लांनी केलेले 6GB फोन टॅपिंग लीक कसे झाले? देवेंद्र फडणवीसच माहिती देऊ शकतात!”

Next Post

मिग-२१ विमानांचा वर्षातील पाचवा अपघात, हवाई दलानं आणखी एक मोहरा गमावला!

Next Post
MIG-21 crash

मिग-२१ विमानांचा वर्षातील पाचवा अपघात, हवाई दलानं आणखी एक मोहरा गमावला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!