Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रश्मी शुक्लांनी केलेले 6GB फोन टॅपिंग लीक कसे झाले? देवेंद्र फडणवीसच माहिती देऊ शकतात!”

राज्य सरकारचा मुंबईतील न्यायालयात दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
rashmi shukla phone tapping got leaked

मुक्तपीठ टीम

राज्यात फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फोन टॅपिंग अहवाल कसा लिक झाला याबाबत देवेंद्र फडणवीसच माहिती देऊ शकतात, असा दावा राज्य सरकारच्यावतीनं मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात करण्यात आला आहे. तसेच हा गोपनीय अहवाल लिक झाला याबाबत तपास करण्याची मागणीही राज्य सरकारने केली आहे.

 

राज्य सरकारची भूमिका

  • राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना यासंदर्भातील ज्या ६ जीबीच्या पेन ड्राईव्हचा उल्लेख केला होता तो विरोधी पक्षनेत्यांपर्यंत कसा पोहचला?
  • तसेच ‘तो’ पेन ड्राईव्ह शुक्ला यांच्याकडनंच दिला गेलाय का यासाठी त्याची न्यायवैद्यकीय चाचणी होणं गरजेचं आहे.
  • त्यामुळे त्याचा ताबा मिळवण्यासाठी राज्य सरकारनं मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात रितसर अर्जही केला आहे.
  • या गोष्टींचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे.
  • कारण रश्मी शुक्ला यांनीच हा अहवाल तयार करून तो गोपनीय असल्याचं जाहीर केलं होत.
  • तसेच त्यांनीच तो सरकार दफ्तरी जमाही केला होता.
  • मग यातली कागदपत्र गहाळ कशी झाली?, याचंही उत्तर त्यांनी द्यायलाच हवं.
  • त्यामुळे रश्मी शुक्ला यांना कठोर कारवाईपासून तूर्तास दिलासा दिलेला असला तरी फोन टॅपिंग प्रकरणी सरसकट दिलासा देता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केली होती.

 

शुक्लांना रितसर नोटीस देण्याचे निर्दे राज्य सरकारला

  • राज्य सरकारनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या अहवालातील कागद आणि पेन ड्राईव्हची मागणी करत दंडाधिकारी कोर्टात अर्ज केला आहे.
  • ज्यावर उत्तर देताना केंद्रीय गृह सचिवांकडनं राज्य सरकारला नेमकं काय हवंय हे त्यांच्या अहवालातून स्पष्ट होत नसल्याचं कोर्टाला सांगतलं.
  • रश्मी शुक्ला यांनी गुप्तचर विभागातून आपली बदली होण्यापूर्वी या अहवालातले कागद अथवा पेन ड्राईव्ह सोबत नेलेला नाही त्यामुळे त्यांची चौकशी होण्याचा प्रश्नचं उद्भवत नाही असा दावा करत रश्मी शुक्ला यांच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला होता.
  • मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं याप्रकरणी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी हायकोर्टात याचिकाहू दाखल केली होती.
  • जी हायकोर्टानं फेटाळून लावली, मात्र शुक्ला यांच्यावर कठोर कारवाई करण्यापूर्वी त्यांना रितसर नोटीस देण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.

Tags: 6gb phone tappingBJPdevendra fadnavisRashmi Shuklastate governmentदेवेंद्र फडणवीसरश्मी शुक्लाराज्य सरकार
Previous Post

सारस्वत बँकेत मार्केटिंग अँड ऑपरेशन्समध्ये ३०० जागांसाठी करिअर संधी

Next Post

स्वदेशी ‘आयएनएस खुकरी’ ला भावपूर्ण निरोप, ३२ वर्षांची गौरवशाली सेवा

Next Post
ins khurki

स्वदेशी ‘आयएनएस खुकरी’ ला भावपूर्ण निरोप, ३२ वर्षांची गौरवशाली सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!