मुक्तपीठ टीम
पितृ पक्ष आजपासून सुरू झाला आहे. यावेळी पितृ पक्ष १६ दिवसांचा आहे. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत सुरू असतो. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजेच आज १० सप्टेंबर २०२२ पासून पितृ पक्ष सुरू होत आहे. त्याच वेळी, अश्विन महिन्याच्या अमावास्येला म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी हे समाप्त होईल. पितृ पक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पितरांचे पूजनीय स्मरण करून त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते. श्राद्ध हे केवळ पितरांच्या मुक्तीसाठीच नाही तर त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठीही केले जाते.
पितृ पक्ष का केले जाते आणि याचे प्रकार कोणते?
- मत्स्य पुराणानुसार श्राद्धाचे १२ प्रकार असले तरी त्याचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत.
- नित्य, नैमित्तिक आणि काम्य असे हे तीन प्रकार आहेत.
- नित्य श्राद्ध म्हणजे जे अर्घ्य आणि आवाहनाशिवाय केले जाते. हे श्राद्ध विशिष्ट प्रसंगी केले जातात. हे श्राद्ध मुळात अष्टक आणि अमावस्येला केले जाते.
- नैमित्तिक श्राद्ध म्हणजे देवतांसाठी केले जाते. हे श्राद्ध अनिश्चित प्रसंगी केले जाते. श्राद्ध पक्षात मूल जन्माला आले तर अशा वेळी नैमित्तिक श्राद्ध केले जाते.
- काम्य श्राद्ध म्हणजे जर काही विशेष फळ मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही काम्य श्राद्ध करू शकता. अनेक लोक स्वर्गाच्या इच्छेसाठी, मोक्षप्राप्तीसाठी किंवा संततीप्राप्तीसाठी काम्य श्राद्ध करतात.
पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते.