Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Chief Minister Dashboard

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाच्या महत्वाच्या विकास योजना आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम) डॅशबोर्डद्वारे तत्काळ मिळणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मुख्यमंत्री डॅशबोर्डची रचना वापरकर्त्यांसाठी सुलभ आणि सहज असण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये मुख्यमंत्री डॅशबोर्डसंदर्भात सादरीकरण आणि मध्यप्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्डचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती व तंत्रज्ञानचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॅशबोर्डच्या पुढील नियोजन आणि अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहेत. या बैठकीत आज सुचविण्यात आलेल्या मुद्दयांचा विचार करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री डॅशबोर्डबाबत पुन्हा एकदा सविस्तर चर्चा होणार असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

“एखाद्या जिल्ह्यातील योजनेवर कशाप्रकारे अंमलबजावणी सुरू आहे, हे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यालयात बसूनच यापुढे कळेल अशी रचना या मुख्यमंत्री डॅशबोर्डची असणार आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात येईल. मुख्यमंत्री डॅशबोर्डचा भर प्रामुख्याने सामान्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या योजना आणि विकास प्रकल्पांची माहिती, सर्वसामान्यांनाकडून येणाऱ्या तक्रारी आणि महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य या चार बाबींवर असेल”, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे शासनाचे सर्व विभाग तसेच त्यांच्या सर्वसामान्यांसाठी असलेल्या सेवा ऑनलाईन स्वरुपात मिळणार आहेत. २४ तास ऑनलाईन सेवा आणि समस्यांचे तत्काळ निराकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना मुख्यमंत्री डॅशबोर्डचा फायदा होणार आहे.

“मुख्यमंत्री डॅशबोर्डचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महत्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती तत्काळ समजण्यास मदत होणार आहे. विविध विभाग, सेवा आणि अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे, जिल्हा आणि तहसील पातळ्यांवर नेमकी काय प्रगती सुरू आहे, हे मुख्यमंत्री डॅशबोर्डाद्वारे समजण्यास मदत होईल”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थितांना मध्यप्रदेश मुख्यमंत्री डॅशबोर्ड तसेच मुख्यमंत्री हेल्पलाईनचे काम कसे होते याबाबतची पूर्ण माहिती दूरदृश्यप्रणालीद्वारे देण्यात आली.


Tags: Chief Minister DashboardCultural Affairs Minister Sudhir MungantiwarDevelopment Schemes and Projectsgood newsmuktpeethstate governmentuseful newsउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठमुख्यमंत्री डॅशबोर्डराज्य शासनविकास योजना आणि प्रकल्पसांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Previous Post

‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

एनआयसीची दक्षता: बनावट एसएमएस प्रकाराचा वेगानं तपास करत आर्थिक घोटाळा टाळला!

Next Post
National Informatics Centre

एनआयसीची दक्षता: बनावट एसएमएस प्रकाराचा वेगानं तपास करत आर्थिक घोटाळा टाळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!