मुक्तपीठ टीम
कोरोनावर लस घेणे हा एकमेव उपाय आहे. आतापर्यंत भारतात शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पार पडले आहे. सरकार वारंवार जनतेला लसीकरणाचे आवाहन करत असताना अद्याप काहीजणांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशांमध्ये नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असलेले किर्तनकार इंदोरीकर महाराज यांचाही समावेश आहे. इंदोरीकर महाराज यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही, असं ते म्हणाले आहेत.
इंदोरीकर महाराज यांनी मागेच मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तो वाद शांत झाला नाही तोच इंदोरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. कोरोना लसीकरणावरून पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका कीर्तनाच्या सोहळ्यादरम्यान ‘कोरोनाची लस घेतली पण नाही आणि घेणारही नाही’, असं ते म्हणाले.
घस घेतलीही नाही आणि घेणारही नाही
- कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं.
- आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं.
- त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही.
- त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या.
- त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले.
- इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका..
- अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती.
- पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही.
- काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची.
- कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं ही टेन्शनने गेली.
- प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे.
- प्रत्येकालाच कोरोना होत नसतो.
- कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे.
प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी
- प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती वेगवेगळी आहे.
- प्रत्येकाच्या मेंदूी क्षमता वेगवेगळी आहे.
- मी तर अजून लस घेतली नाही आणि घेणारही नाही.
- काही होतच नाही तर घेऊन काय करायचं.
- कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा.
- एकीकडे सरकार देशभरात लसीकरण मोहीम राबवत आहे.
- कोट्यावधी लोकांनी लस घेतली आहे.
- पण समाज प्रबोधनाचे धडे देणाऱ्या कीर्तनकारानेच कीर्तनातून लस घेतली नाही आणि घेणार नाही.