Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी

राज्य निवडणूक आयुक्तांचे अव्हान

November 3, 2021
in सरकारी बातम्या
0
maharashtra state election commission

मुक्तपीठ टीम

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

 

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.

 

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी १ नोव्हेंबरपासून ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी १ जानेवारी २०२२ हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मदतार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

 

मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम

  • प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: १ नोव्हेंबर २०२१ 
  • प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे: ३० नोव्हेंबर २०२१ 
  • दावे व हरकती निकाली काढणे: २० डिसेंबर २०२१ पर्यंत
  • अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: ५ जानेवारी २०२२ 

 

आपण हे करू शकतो

  • विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे
  • १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते
  • आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील
  • आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
  • एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा
  • आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे
  • नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल

 

नाव नोंदणी कुठे कराल? 

  • ऑनलाईन नाव नोंदणीसाठी- www.nvsp.in
  • छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे

 

नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने

  • प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. ६
  • अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. ६अ
  • इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. ७
  • मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. ८
  • एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. ८अ

 

निवासाचा दाखला (कोणताही एक)

  • जन्म दाखला
  • भारतीय पारपत्र
  • वाहन चालक परवाना
  • बँक/ किसान/ पोस्ट पासबूक
  • सिधावाटप पत्रिका
  • प्राप्तिकर निर्देशपत्रिका
  • पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक
  • टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र

 

वयाचा दाखला (कोणताही एक)

  • भारतीय पारपत्र
  • वाहन चालक परवाना
  • पॅन कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • १२ वी, १० वी, ८ वी किंवा ५ वीची गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • २१ वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-३

 

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी

  • कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
  • कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/ JPEG असावी

Tags: State Election CommissionerU. P. S. Madanयू. पी. एस. मदानराज्य निवडणूक आयुक्त
Previous Post

महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी येथील सुविधांचा केंद्रीय राज्यमंत्री आठवलेंकडून आढावा

Next Post

“कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही”, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Next Post
indurikar maharaj

"कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही", इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!