मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाने आता कारागृहातही हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. भायखळा कारागृहातही शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीसह ३८ कैदी कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आलं आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर भायखळा कारागृहात कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
गेल्याच आठवड्यात एक महिला कैदी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सेंट जॉर्ज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत कारागृहातील ३५० कैद्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ३८ जण कोरोना पॉझिटिव्ह आले. या ३८ जणांमध्ये इंद्राणी मुखर्जीचाही समावेश आहे. या सर्व कैद्यांना सध्या भायखळा येथील पाटणवाला उर्दू शाळेत तात्पुरत्या कोरोना केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.