Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“रामायण सर्कीट तयार केल्यास रोजगार निर्मितीसह युवकांना प्रेरणा मिळेल”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन

April 21, 2021
in सरकारी बातम्या
0
bhagat singh

मुक्तपीठ टीम

 

प्रभू रामाप्रमाणे रामायण संस्कृती विश्वव्यापक असून नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, कंबोडिया यांसह अनेक देशात या संस्कृतीची पदचिन्हे आढळतात. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली देशातील विविध ठिकाणे, तसेच रामायण संस्कृती जतन करीत असेलेले देश पर्यटनाच्या दृष्टीने जोडून रामायण सर्कीट तयार केल्यास त्यातून रोजगार निर्मिती होईल व युवा पिढीला नवी प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

 

वरिष्ठ केंद्रीय अधिकारी डॉ. अनंत दीनानाथ दुबे लिखीत ‘राम-रामायण तीर्थाटन के आयाम’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथून ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

लोकांच्या मनात प्रभू रामाबद्दल विशेष आस्था आहे. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेच्या माध्यमातून लोकांनी रामाची जीवन कथा भावभक्तीने पाहिली. भारतात देशाटन व तीर्थाटनाची परंपरा फार जुनी आहे. त्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून रामायण पर्यटनाला चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.

 

रामायण संस्कृतीशी संबंधित माहिती प्रकाशात आणल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन करताना प्रभू रामाप्रमाणे त्याग, समर्पण व भक्ती हे आदर्श जीवनात अंगीकारल्यास महात्मा गांधींच्या संकल्पनेतील रामराज्य साकार करता येईल असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

 

‘स्माल इज ब्युटीफुल’ या उक्तीप्रमाणे ‘राम’ हे छोटेसे नाव असले तरीही ते जन्मापासून श्वासाच्या अंतिम क्षणापर्यंत साथ देणारे आहे. रामायणाचे सखोल अध्ययन केल्यास समाज सद्गुण आत्मसात करेल, असे राज्यपालांनी सांगितले.

 

पुस्तक प्रकाशन सोहळ्याला इन्दिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्लीचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानन्द जोशी, अयोध्या येथील डॉ. राममनोहर लोहिया अवध विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू प्रो. मनोज दीक्षित, जीवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर येथील पुरातत्व विभागाचे सेवानिवृत्त अध्यक्ष प्रो. राम अवतार शर्मा, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या कलानिधि विभागाचे अधिष्ठाता प्रो. (डॉ.) रमेश चन्द्र गौड़ आदी उपस्थित होते.

 

 

 


Tags: governor bhagat singh koshyariराज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Previous Post

“कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होता कामा नये!” भुजबळांचे कडक आदेश

Next Post

भायखळा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, इंद्राणी मुखर्जीसह ३८ कैद्याना कोरोना

Next Post
indrani mukjree

भायखळा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, इंद्राणी मुखर्जीसह ३८ कैद्याना कोरोना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!