Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीनं मृत्यूकांड, दुर्लक्ष करणाऱ्या दोषींवर कारवाईसाठी टाहो

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
nasik oxygen leakage -1

मुक्तपीठ टीम

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा अचानक थांबल्याने २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या या अत्याधुनिक रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या टाकीच्या व्हॉल्व्हमध्ये गळती होत असूनही कुणाचे लक्ष गेले नाही. तेथे ऑक्सिजन टँकर आल्यानंतर गळती होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या २२ निरपराधांचे जीव दुर्लक्षामुळेच गेल्याचा आरोप होत आहे. त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक टाहो फोडताना करत आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

नाशिकच्या रुग्णालय मृत्यूकांड कसं घडलं?

  • डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय ऑक्सिजन गळतीच्या घटनेत २२जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
  • गळती झालेला ऑक्सिजन टँक हा १३ हजार किलोलीटर क्षमतेचा होता.
  • त्या टाकीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने तो बदलण्याचे काम सुरु होते.
  • गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता.
  • या रुग्णालयात एकूण १५० रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.
  • १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि इतर रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.
  • २२ मृतांमध्ये ११ स्त्री आणि ११ पुरुष आहेत.
  • ऑक्सिजन टाकीत गळती झाल्याने तो सभोतालच्या परिसरात पसरला होता.
  • या मृत्यूकांडानंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. शर्थीचे प्रयत्न करुन डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली गेली आहे.
  • आता पुरवठा पूर्ववत झाला आहे.
  • या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.

nashik -2डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉयचे शर्थीचे प्रयत्न

  • ऑक्सिजन गळतीनंतर पुरवठा बंद झाल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपल्या डोळ्यांसमोर रुग्णांना तडफडताना पाहावे लागले
  • आरोग्य रक्षकांनी काही रुग्णांना इतरत्र हलवण्याचा प्रयत्न केला.
  • शक्य त्या मार्गाने इतर रुग्णांना वाचवण्यासाठीही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांचा नाइलाज झाला.

मुक्तपीठचे प्रश्न

  • डॉ. झाकिर हुसैन रुग्णालय हे कोरोना रुग्णालय आहे. त्यामुळे तेथे ऑक्सिजनची टाकी खूप महत्वाची. १३ हजार किलोलीटरच्या टाकीच्या देखभालीकडे दुर्लक्ष का झाले?
  • अशा प्रकारची दुर्घटना, इतर काही तांत्रिक समस्या उद्भवू शकते, याची शक्यता लक्षात घेऊन अत्यावश्यक कक्षात पर्यायी व्यवस्था का नव्हती?
  • मृत्यूकांडासाठी जबाबदार असलेल्यांच्या दुर्लक्षाच्या गुन्ह्याबद्दल कठोर कारवाई केली जाणार का?
  • भविष्यात महाराष्ट्रात इतर कुठे असं घडू नये यासाठी सरकार आणि स्थानिक मनपा, मपा अशा प्रकारच्या पर्यायी उपाययोजना ठेवणार का?

 


Previous Post

भायखळा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, इंद्राणी मुखर्जीसह ३८ कैद्याना कोरोना

Next Post

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती

Next Post
kolhapur

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!