Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई ते इंदूर…ज्वेलर्सना गंडा…वॉण्टेड आरोपींना अटक

January 26, 2021
in कायदा-पोलीस
0
crime

मुक्तपीठ टीम

 

इंदूरच्या एका हायटेक सायबर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना वाशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने खारघर परिसरातून शिताफीने अटक केली. नरेंद्र सिंग ऊर्फ दशरथसिंग राजपुरोहित आणि विजयसिंग ऍबेसिंग सोलंकी अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही मूळचे राजस्थानच्या जालोर, बिगतारा आणि बिनमलचे रहिवाशी आहेत.

 

राजस्थानच्या इंदूर शहरातील हायटेक सायबर गुन्ह्यांतील दोन फरार आरोपी खारघर परिसरात लपले आहेत. दोन्ही आरोपी फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असून ते खारघर येथून पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सहपोलीस आयुक्त जय जाधव, पोलीस उपायुक्त मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, सम्राट वाट, पोलीस हवालदार काकडे, मोरे, पोलीस नाईक पाटील, पोलीस शिपाई वाघ, धोंडे यांनी खारघर येथील कोपरगाव परिसरातून नरेंद्रसिंग आणि विजयसिंग या दोघांना अटक केली.

 

पोलीस तपासात नरेंद्रसिंग हा कमिशन एजंट तर विजयसिंग हा चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक हुंडाई आय-२० कार, वेगवेगळ्या कंपनीचे सहा मोबाईल, महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती असलेल्या चार पुस्तिका, ऍक्सिस बँकेचे एटीएम डेबीट कार्ड जप्त केले आहेत. पोलीस तपासात या दोघांविरुद्ध इंदूरच्या सायबर सेल पोलीस ठाण्यात ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४०६, ४२०, ३४ भादवी सहकलम ६६ ड आयटी कलमांतर्गत एक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक फसवणुकीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले. ही टोळी आपसांत संगनमत करुन एका मोठ्या ज्वेलर्सची आयडेन्टीटी घेऊन फोनवरुन दुसर्‍या ज्वेलर्स व्यापार्‍याला ते मोठे ज्वेलर्स व्यापारी असल्याचे सांगत, त्यांच्यावर स्वत:चा प्रभाव पाडून त्यांना व्यवहारासाठी पैशांची गरज आहे, असे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे पेमेंट घेत होते.

 

दागिन्यांची मोठी ऑर्डर मिळत असल्याने संबंधित व्यापारी त्यांना ही रक्कम देत होते. मात्र ही रक्कम मिळाल्यानंतर ही टोळी मोबाईल फोन करुन पळून जात होती. मुंबईसह इंदूर शहरात या टोळीने अशाप्रकारे अनेकांची फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. या दोघांच्या अटकेनंतर त्यांची माहिती इंदूरच्या सायबर सेल पोलिसांना देण्यात आली होती. नवी मुंबईत आलेल्या या पथकाला नंतर या दोन्ही आरोपींचा ताबा देण्यात आला. त्यांना घेऊन संबंधित पोलीस पथक पुढील चौकशीसाठी इंदूर येथे गेल्याचे पोलिसांनी सांगितले.


Tags: Cyber cell policeHi-tech cyber crimeNew Mumbaiनवी मुंबईसायबर सेल पोलिस
Previous Post

शेतकरी आंदोलक लाल किल्ला परिसरात! फडकले वेगळे झेंडे! शेतकरी नेत्यांकडूनही निषेध!

Next Post

सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो ‘हा’ क्रिकेटर?

Next Post
Sachin Tendulkar -1

सचिनचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो 'हा' क्रिकेटर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!