Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलक लाल किल्ला परिसरात! फडकले वेगळे झेंडे! शेतकरी नेत्यांकडूनही निषेध!

January 27, 2021
in घडलं-बिघडलं
0
tractor rally

मुक्तपीठ टीम

 

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅलीने आज हिंसक वळण घेतले आहे. शेतकरी आंदोलकांनी ठरलेले मार्ग सोडून दिल्लीत प्रवेश केला. काही शेतकरी आंदोलक थेट लाल किल्ला परिसरात घुसले. त्यांच्यापैकी काहींनी तिथे शेतकरी संघटनेचे आणि खालसा पंथाचे झेंडे फडकवले. अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवरच ट्रॅक्टर चढविण्यास आणि तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली.

 

इंटरनेट सेवा बंद

शेतकरी येथून निघून गेले आहेत. पोलिसांनी आता सगळीकडे अधिक बंदोबस्त वाढवला आहे. या परिसरात इंटरनेटचा वेगही कमी करण्यात आला आहे. काही ठिकाणी रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरविल्या जाऊ नयेत.

 

शेतकरी नेत्यांकडून हिंसाचाराचा निषेध

संयुक्त किसान मोर्चाचे नेते योगेंद्र यादव यांनी काही शेतकरी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. कडक शब्दात अशा वागण्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी आंदोलकांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसा आणि तोड-फोडीमध्ये समाविष्ट होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले होते. तरीही अशा घटना घडल्यामुळे शेतकरी आंदोलनाचेच नुकसान होईल, असेही त्यांनी बजावले.

 

तसेच योगेंद्र यांनी, वर्दीतील जवानांवर वाहन चढवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते निंदनीय आहे आणि पूर्णपणे शिस्तीच्या बाहेर आहे. आम्ही स्टेजवरुन वारंवार सांगत आलो आहोत की, वर्दीतील उभा असलेला हा तरुण एक शेतकरीच आहे. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडल्यास आम्ही त्याचा पूर्णपणे निषेध करतो, असे ते म्हणाले.

 

शेतकऱ्यांच्या हिंसाचाराबद्दल योगेंद्र यादव म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार कुणी पसरवला हे आम्ही शोधून काढू. शेतकर्‍यांचा गोंधळ हा पेचात पाडणारा विषय आहे. तसेच लाल किल्ल्याच्या तटबंदीवर शेतकरी संघटनेचा झेंडा फडकविणे चुकीचे आहे. मी अशा प्रकारे निषेध व्यक्त करणार्‍या शेतकर्‍यांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो, असेही योगेंद्र पुढे म्हणाले.

 

तर भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, हि रॅली शांततेने काढण्यात येणार होती. मात्र, या रॅलीला मिळालेल्या हिंसक वळणाबद्दल आम्हाला काहीच कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.


Tags: Farmer Delhi ProtestFarmer protest 2020Farmer tractor rally
Previous Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजारोहण

Next Post

मुंबई ते इंदूर…ज्वेलर्सना गंडा…वॉण्टेड आरोपींना अटक

Next Post
crime

मुंबई ते इंदूर...ज्वेलर्सना गंडा...वॉण्टेड आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!