Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतचा नवा अवतार! सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा पूर्ण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Indigenous warship Vikrant

मुक्तपीठ टीम

विक्रांत या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्यांचा चौथा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. हवाई वाहतूक सुविधा समन्वित उपकरणांसह बहुतांश उपकरणे आणि प्रणालींच्या एकात्मिक चाचण्या घेण्यात आल्या. या महिन्याच्या अखेरपर्यंत पर्यंत युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आणि त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑगस्टमध्ये ही युद्धनौका नौदलाच्या सेवेत औपचारिकरीत्या दाखल होणार आहे.

भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने ७६% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री वापरत केलेली या विमानवाहू जहाजाची स्वदेशी रचना आणि बांधणी हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया उपक्रम’ साठी देशातील संशोधनाचे एक चमकदार उदाहरण आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पूरक उद्योगांच्या विकासाबरोबरच,२ हजारहून अधिक कोचीन शिपयार्ड लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना आणि पूरक उद्योगांमध्ये सुमारे १२ हजार कर्मचार्‍यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊन रचना आणि बांधणी क्षमतांमध्ये वाढ झाली आहे.

स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतच्या पहिल्या टप्प्यातील सागरी चाचण्या २१ ऑगस्ट मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्यानंतर सागरी चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा अनुक्रमे २१ ऑक्टोबर आणि २२ जानेवारीला पूर्ण झाला. सागरी चाचण्यांच्या या तीन टप्प्यांदरम्यान, परिचालन यंत्रसामग्री, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सूट्स, डेक मशिनरी, जीवरक्षक उपकरणे, जहाजाची दिशादर्शक आणि दळणवळण प्रणालीची क्षमता चाचणी घेण्यात आली.


Tags: good newsindigenous aircraft carrier Vikrantmarine testmuktpeethVikrantघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठविक्रांतसागरी चाचणीस्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत
Previous Post

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाठ्यपुस्तके निर्मिती! सहभागासाठी लिंक क्लिक करा…

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या १२६ जागांवर संधी

Next Post
Rashtrasant Tukdoji Maharaj University

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 'सहाय्यक प्राध्यापक' पदाच्या १२६ जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!