मुक्तपीठ टीम
‘कू’ हा देशातील एक उदयोन्मुख मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. अलीकडेच ‘कू’ अॅपला आशिया पॅसिफिक (APAC) प्रदेशातील टॉप-5 सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. ही यादी अॅम्प्लिट्यूडने तयार केली आहे. कू अॅपवर, यूजर्स स्वतःला त्यांच्या भाषेत व्यक्त करू शकतात. APAC, US आणि EMEA मधील हा एकमेव सोशल मीडिया ब्रँड आहे ज्याला या यादीत स्थान मिळाले आहे.
कू च्या सह-संस्थापक आणि CEO, अप्रमाया राधाकृष्ण यांनी या सन्मानाबद्दल स्वाभाविकच आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “आम्हाला खूप आनंद होत आहे की या जागतिक अहवालात कू अॅपचा समावेश झाला आहे.ली आहे. APAC प्रदेशातील टॉप ५ सर्वात लोकप्रिय डिजिटल उत्पादनांपैकी एक म्हणून ‘कू’ अॅपला स्थान दिले आहे. या यादीत भारतातील आणि APAC, EMEA आणि यूएसमधील आम्ही एकमेव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहोत. भारतातून जगासाठी तयार केलेला ब्रँड म्हणून काम करताना आमच्यासाठी ही एक मोठी कामगिरी आहे.”
अॅम्पलिट्युडचा डेटा जगभरातील सर्वात लोकप्रिय उदयोन्मुख डिजिटल उत्पादने दाखवतो. अहवालात असे म्हटले आहे की “कू अॅप अब्जावधींच्या समुदायासाठी त्यांच्या पसंतीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनण्यासाठी सज्ज आहे.”
अॅम्प्लिट्यूड ही कॅलिफोर्नियामधील उत्पादन विश्लेषण आणि डिजिटल कस्टमायझेशन फर्म आहे. त्यांच्या अहवालात ‘कू’ अॅपसाठी ‘जलद वाढणारे उत्पादन’ असे गौरवोद्गार नोंदवले आहेत. त्यांनी या कंपन्या निवडण्यासाठी मासिक यूजर्स डेटा गोळा केला आणि त्याचे विश्लेषण केले. जे भविष्यात सर्वांच्या उपयोगी येऊ शकेल. अॅम्प्लिट्यूडने त्यांच्या यूजर्सना उत्कृष्ट डिजिटल अनुभव देणाऱ्या कंपन्या निवडल्या आहेत. जून २०२० ते जून २०२१ या १३ महिन्यांच्या कालावधीत एकूण मासिक सक्रिय यूजर्सच्या संख्येतही वाढ झाली आहे.