Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्त्रोचा भविष्यवेध…स्वत:लाच संपवणारे रॉकेट, उपग्रह! हॅक न होणारे संदेशवहन!!

November 25, 2021
in Uncategorized
0
Isro

मुक्तपीठ टीम

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करत आहे. इस्रोची टीम सध्या काम संपल्यावर स्वत:ला नष्ट करू शकणारे रॉकेट आणि उपग्रह बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी कोणालाही हॅक करता येणार नाही अशी कम्युनिकेशन सिस्टम विकसित करण्याच्या प्रकल्पावरही काम सुरु आहे. ही यंत्रणा लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

 

इस्त्रोला या दोन शोध प्रकल्पांमध्ये यश मिळालं तर मोठा फायदा होईल. इस्रोला अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याबाबतीतही अमेरिकन स्पेस एजन्सी नासाला आणि रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसशी स्पर्धा करता येईल. सध्यातरी या स्पर्धेत इस्त्रोपेक्षा चीनची स्पेस एजन्सी म्हणजेच चायना नॅशनल स्पेस एजन्सी ही सर्वात पुढे आहे.

 

इस्त्रोच्या भविष्यवेधी योजना

  • इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी डीटीडीआय-टेक्नॉलॉजी कॉन्क्लेव्ह-२०२१ समिटमध्ये या योजनांची माहिती दिली.
  • इस्रो अंतराळ क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान शोधण्यात आणि त्याचा वापर करण्यात गुंतलेली आहे.
  • त्यांनी अनेक नवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख केला.
  • उदाहरणार्थ, क्वांटम आधारित उपग्रह. इस्रो आता हा उपग्रह बनवणार आहे, तर अमेरिकेने नुकतेच अशा एका उपग्रहाचा वापर केला आहे.

 

क्वांटम रडार, सेल्फ-ब्रिकिंग रॉकेट्स, सेल्फ-एलिमिनेटेड सॅटेलाइट्स, सेल्फ-रिकव्हरी ऑब्जेक्ट्स, ह्युमनॉइड रोबोट्स, स्पेस बेस्ड सोलर पॉवर, इंटेलिजेंट सॅटेलाइट्स, स्पेस व्हेइकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड स्पेस अॅप्लिकेशन्स इत्यादी संकल्पनांवर काम केले जात आहे.

 

स्वत: नष्ट होणाऱ्या उपग्रहास वेळ…

  • अंतराळातील कचरा कमी करण्यासाठी इस्रो काम करत आहे.
  • ते अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामध्ये काम संपल्यानंतर निरुपयोगी उपग्रह स्वतः वाफेच्या रूपात नष्ट होऊ शकतीत.
  • भारताकडे अजूनही पुन्हा वापरता येण्याजोगे रॉकेट्स विकसित नाही.

 

लेझरवरून संदेश पाठवण्याची चाचणी यशस्वी!

  • क्वांटम कम्युनिकेशन सिस्टीममध्ये चांगली प्रगती आहे.
  • इस्रोने ३०० मीटर अंतरापर्यंत लेझर लाइटद्वारे संदेश पाठविण्याची यशस्वी चाचणी केली आहे.
  • यानंतर हे तंत्रज्ञान उपग्रहांमध्ये बसवले जाईल.
  • पृथ्वीच्या कक्षेतून लेझर जमिनीवर पाठवेल, असे शक्तिशाली लेझर लाइट उपकरण तयार केले जाईल.

 

इस्रोचे प्रमुख सिवन यांचा दावा आहे की, ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलले जात आहे त्यावर अंतराळ विभाग आणि इस्रोच्या विविध केंद्रांवर काम केले जात आहे. जर सर्व केंद्रे सामंजस्याने काम करत राहतील तर, लवकरच आपण हे तंत्रज्ञान प्रयोगशाळांमधून बाहेर काढू शकू आणि सामान्य वापरात आणू शकतो. या कामात सरकारी-खासगी आणि आंतरराष्ट्रीय करार असेल तर ही कामे अधिक सहज आणि वेगाने करता येतील.

पाहा व्हिडीओ: 


Tags: Indian Space Research OrganizationisroLaser Light TechnologymuktppeethQuantum Communication SystemsrocketSatelliteSpace and Satellite Technologyअंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञानइस्त्रोउपग्रहक्वांटम कम्युनिकेशन सिस्टीमभारतीय अंतराळ संशोधन संस्थामुक्तपीठरॉकेटलेझर लाइट तंत्रज्ञान
Previous Post

रासायनिक खत वापर कमी करण्याचे महाराष्ट्राचे प्रयत्न, केंद्र सरकारकडूनही दखल!

Next Post

भारताच्या ‘कू’ अॅपचा आशिया पॅसिफिकमधील टॉप-3 हॉटेस्ट प्रोडक्टमध्ये समावेश!

Next Post
Koo app

भारताच्या ‘कू’ अॅपचा आशिया पॅसिफिकमधील टॉप-3 हॉटेस्ट प्रोडक्टमध्ये समावेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!