Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत गौरव योजनेत कोइबंतूर ते शिर्डी पहिली मेड इन इंडिया ट्रेन! पहिली खासगी ट्रेन!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
private train from Koibantur to Shirdi

मुक्तपीठ टीम

भारत गौरव योजनेंतर्गत पहिली खासगी ट्रेन सुरू झाली आहे. भारतीय रेल्वेने देशातील ही पहिली खासगी ट्रेन सुरू केली आहे. ही रेल्वे सेवा कोइबंतूर ते शिर्डी या मार्गावर धावणार आहे. या खासगी रेल्वेला १४ जून २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासगी ट्रेन सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ट्विट करून व्हिडिओही पोस्ट केला.

माहिती देताना, सीपीआरओ दक्षिण रेल्वे बी गुग्नेसन म्हणाले की, “भारत गौरव योजनेंतर्गत भारतातील पहिली खाजगी रेल्वे सेवा १४ जून रोजी कोइबंतूर येथून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर रवाना झाली. उत्तरेकडील कोइबंतूर येथून सुटली आहे आणि गुरूवारी म्हणजेच १६ जून रोजी शिर्डीच्या साई नगर येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एका वेळी १ हजार ५०० लोक प्रवास करू शकतात.” या रेल्वेची प्रवासात वेळोवेळी साफसफाई केली जाईल.

भारत गौरव रेल्वे कोइबंतूरहून सुटताना ७ स्थानकांवर थांबेल

  • ही ट्रेन कोइबंतूरहून सुटेल ७ स्थानकांवर थांबेल.
  • ट्रेन कोइबंतूर येथून सुरू होईल आणि तिरुपूर, इरोड, सेलम, येलाहंक, धर्मावरम, मंत्रालयम रोड आणि वाडी येथे थांबेल.
  • तर शिर्डीहून परतताना ही रेल्वे वाडी, धर्मावरम, येलहंक, सेलम, इरोड आणि तिरुपूर येथे थांबेल.
  • भारतातील पहिली खासगी ट्रेन कोइबंतूर सोडल्यानंतर सुमारे ५ तास मंत्रालयम रोड रेल्वे स्थानकावर थांबेल. जेणेकरून प्रवाशांना मंत्रालयम रोड मंदिरात चांगले दर्शन घेता येईल.

भारत गौरव रेल्वेमध्ये तिकीटांच्या किंमती

या ट्रेनमध्ये स्लीपर नॉन एसीसाठी २ हजार ५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५ हजार रुपये, सेकंड एसीसाठी ७ हजार रुपये आणि फर्स्ट क्लास एसी तिकिटासाठी १० हजार रुपये मोजावे लागतील.

भारत गौरव रेल्वेची रचना

  • भारतातील पहिल्या खासगी ट्रेनमध्ये एकूण २० डबे आहेत आणि ती २ वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.
  • यामध्ये फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि स्लीपर क्लासचे डबे आहेत.
  • ही ट्रेन महिन्यातून किमान ३ वेळा धावणार आहे.
  • ही ट्रेन कोइबंतूर उत्तरेकडून संध्याकाळी ६ वाजता सुटेल आणि गुरुवारी सकाळी ७.२५ वाजता शिर्डीच्या साई नगरला पोहोचेल.
  • या ट्रेनमध्ये प्रवाशांना शाकाहारी जेवण दिले जाणार आहे. यासोबतच ट्रेनमध्ये एक डॉक्टरही प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी असणार आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Bharat Gaurav Railwaycoimbatorecoimbatore to Shirdi Marggood newsindian railwaysmuktpeethPrivate Trainकोइबंतूरकोइबंतूर ते शिर्डी मार्गखासगी ट्रेनचांगली बातमीभारत गौरव रेल्वेभारतीय रेल्वेमुक्तपीठ
Previous Post

उत्सव कृषि संस्कृतीचा, बळीराजाचा सखा बैलाचा बेंदूर सण दणक्यात साजरा!

Next Post

आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी बहारिनमध्ये भारताचा आंबा महोत्सव

Next Post
Bahrain

आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी बहारिनमध्ये भारताचा आंबा महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!