मुक्तपीठ टीम
देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी आहे. इंधन दरवाढ आणि महागाई यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक कार बाजार खूप वेगाने वाढत आहे. येथे जवळपास प्रत्येक ब्रँडच्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत. आता या इलेक्ट्रिक कारच्या शर्यतीत PMV Eas-E इलेक्ट्रिक कारनेही पाऊल टाकले आहे. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे.
पीएमव्ही ईएएस-ई इलेक्ट्रिक कारचे फिचर्स
- पीएमव्ही ईएएस-ई या इलेक्ट्रिक कारमध्ये 4G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.
- या फीचरच्या मदतीने कार स्मार्टफोनशी कनेक्ट करता येईल.
- या कारमध्ये रिमोट पार्किंग असिस्टन्स, क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि डायग्नोस्टिक्स आणि ऑनबोर्ड नेव्हिगेशन यासारखे फिचर्स मिळतात.
- या कारमध्ये एका चार्जमध्ये २०० किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते.
पीएमव्ही ईएएस-ई कार इंजिन
या इलेक्ट्रिक कारच्या इंजिनमध्ये कंपनीने १३बीएचपी पॉवर निर्माण करणारी मोटर वापरली आहे. टॉर्क आउटपुटमध्ये त्याची मोटर ५०एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये ७० किमीपर्यंत टॉप स्पीडपर्यंत पोहोचता येते. त्याच वेळी, ०-४० चा वेग पकडण्यासाठी ५ सेकंद लागतात.
इलेक्ट्रिक कारची किंमत
- या इलेक्ट्रिक कारची बेस व्हेरिएंट ४ लाख ७९ हजार रुपयांपासून सुरू होते.
- ही किंमत फक्त पहिल्या १० हजार खरेदीदारांसाठी वैध असेल. . काही दिवसांनी या कारची किंमत ६.७९ लाख रुपये आणि ७.७९ लाख रुपये होईल.
- २ हजार रुपये टोकन रक्कम भरून ही कार बुक करता येते.