मुक्तपीठ टीम
भारताबाहेर इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी २०२२ साली सुमारे १०० अब्ज डॉलर्स पाठवले असून, हा नवा विक्रम आहे. त्यामुळे २०११चा ८७ अब्ज डॉलर्सचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही रक्कम भारतीय शेअर बाजारातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२२ या वर्षात परदेशातून भारतात येणाऱ्या पैशात १२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परदेशात कमाई करणाऱ्या भारतीयांनी इतका पैसा पाठवला, जो देशाच्या शेअर बाजारात येणाऱ्या विदेशी गुंतवणुकीपेक्षा (एफडीआय) सुमारे २५ टक्के जास्त आहे. भारतानंतर मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्सचा क्रमांक लागतो.
परदेशातून येणाऱ्या पैशात वाढ!
- यावेळी इतर देशांमध्ये अनौपचारिक रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या.
- यासोबतच सिंगापूर, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांसारख्या जगातील अनेक श्रीमंत देशांमध्येही भरपूर नोकऱ्या मिळाल्या होत्या.
- गेल्या काही वर्षांत परदेशातून भारतात पाठवल्या जाणाऱ्या रकमेत सातत्याने वाढ होत आहे.
- येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
२०२१ मध्ये भारतीयांनी ८७ अब्ज डॉलर पाठवले
- परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी गेल्या वर्षी सुमारे ८७ अब्ज डॉलर भारतात पाठवले होते.
- यामध्ये सर्वाधिक रक्कम अमेरिकेतून पाठवण्यात आली होती.
- २०२० मध्ये सुमारे ८३ अब्ज डॉलरची रक्कम पाठवण्यात आली होती.
- २०१६-२०१७ आणि २०२०-२१ दरम्यान, यूएस, युनायटेड किंगडम आणि सिंगापूरमधून पाठवलेल्या रकमेचा वाटा २६ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांहून अधिक झाला आहे.
- पाच जीसीसी देश सौदी अरेबिया, यूएई, कुवेत, ओमान आणि कतार यांच्याकडून पाठवल्या जाणाऱ्या रकमेत घट झाली आहे.
- ५४ टक्क्यांवरून २८ टक्क्यांवर घसरला आहे.