Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्विस बँकांमधील भारतीयांच्या पैशाचं काय झालं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
SwissBank

मुक्तपीठ टीम

भारतीयांचे स्विस बँकेतील पैशांसंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे २०२१ च्या अखेरीस स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवींमध्ये ८.३ टक्क्यांनी घट झाल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. याशिवाय काळा पैसा कर कायद्यांतर्गत परदेशात अघोषित संपत्ती जमा करण्याच्या ३६८ प्रकरणांमध्ये १४ हजार ८२० कोटी रुपयांचे कर दायित्व उघड झाले आहे. सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच त्या म्हणाल्या की २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये परदेशात दडवलेल्या भारतीयांच्या काळ्या पैशात वाढ झाल्याच्या कथित मीडिया रिपोर्ट्स प्रत्यक्षात दिशाभूल करणारे आहेत.

निर्मला सीतारणम म्हणाल्या की, प्रसारमाध्यमांसह अनेक लोकांमध्ये सामान्य समज असा आहे की, स्वित्झर्लंड आणि परदेशात जमा असलेली सर्व भारतीयांची संपत्ती काळा पैसा (अघोषित) आहे. मात्र, बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटच्या स्थानिक बँकिंग आकडेवारीच्या आधारे प्रसारमाध्यमे काळा पैसा वाढल्याचा दावा करत आहेत, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांच्या ठेवींमध्ये घट झाली आहे.

१४ हजार ८२० कोटी कर वसुलीची प्रक्रिया सुरू झाली!!

  • अर्थमंत्र्यांनी सांगितले की, परदेशात दडवलेला अघोषित पैसा परत आणण्याचा प्रश्न आहे, या संदर्भात तयार करण्यात आलेल्या काळा पैसा कायदा, २०१५ अंतर्गत एकूण ६४८ प्रकरणांमध्ये ४ हजार १६४ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे.
  • त्यापैकी ३६८ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून त्यांच्याकडून १४ हजार ८२० कोटी रुपयांची कराची मागणी करण्यात आली आहे.
  • ही रक्कम दंड आणि व्याजासह आहे.
  • आतापर्यंत २ हजार ४७६ कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल झाला आहे.

Tags: IndiaIndian DepositsSwiss BankUnion Finance Minister Nirmala Sitharamanकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनस्विस बँक
Previous Post

विजय दिवस: कारगिलमध्ये पाकड्यांना हुसकावणाऱ्या भारतीय शौर्याची गाथा! वाचा ठळक मुद्दे…

Next Post

गडकरी म्हणालेले डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा हायवे पूर्ण होणार, पण पावसाने बनवलेलाही खचला!

Next Post
Mumbai goa highway broken

गडकरी म्हणालेले डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा हायवे पूर्ण होणार, पण पावसाने बनवलेलाही खचला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!