मुक्तपीठ टीम
भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने शुक्रवारी कैरो इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि अभिनव बिंद्रानंतर हा पराक्रम गाजवणारा रुद्रांक्ष हा दुसरा भारतीय ठरला आहे. पाटील याने देशासाठी २०२४ पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला. भारताचा हा दुसरा ऑलिम्पिक कोटा होता. रुद्रांक्ष पाटील याच्या या कामगिरीमुळे त्याचं कौतुक केलं जात आहे.
१३-१७ च्या स्कोअरलाइनसह सुवर्णपदाचा मानकरी!
- १८ वर्षीय रुद्रांक्ष सुवर्णपदकाच्या सामन्यात नवीन फॉरमॅटमध्ये ४-१० ने पिछाडीवर होता.
- नवव्या मालिकेत २ गुण घेत स्कोअर ११-७ केला.
- पुन्हा मालिका जिंकूत त्याने ११-९ अशी आघाडी घेतली.
- सॉलाझोने ११व्या मालिकेत १३-९ अशी आघाडी घेतली होती तर, रुद्रांक्ष पाटीलने १३-१७ च्या स्कोअरलाइनसह सुवर्णपदक जिंकण्यासाठी १०.५ च्या खाली शूट न करता पुढील चार मालिका जिंकल्या.
रुद्रांक्ष पाटील हा अभिनव बिंद्रा, तेजस्विनी सावंत, मानवजीत सिंग संधू, ओम प्रकाश मिथरवाल आणि अंकुर मित्तल यांच्यानंतर भारताकडून सहावा नेमबाजी विश्वविजेता ठरला. पुरुषांच्या एअर रायफल स्पर्धेत भारताचा शेवटचा जागतिक चॅम्पियन २००६ मध्ये झाग्रेब येथे अभिनव बिंद्रा होता. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता गगन नारंगने २०१० मध्ये म्युनिक येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, तर अंजुम मौदगिलने २०१८ मध्ये महिलांच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
कोण आहे रुद्रांक्ष पाटील?
- रुद्रांक्ष पाटील हा पालघर चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि वाशी येथील आरटीओ विभागात उपायुक्त असलेल्या हेमांगिनी पाटील यांचा मोठा मुलगा आहे.
- त्याने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत २० सुवर्ण १२ रोप्य आणि ०७ रजत पदके जिंकले आहेत.
- त्याने खेलो इंडिया युथ स्पर्धा २०२० मध्ये सुवर्णपदक मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ८ सुवर्ण ३ रोप्य पदके मिळवली आहे.
- रुद्राक्ष सध्या सीनियर वर्ल्ड रँकिंगच्या सातव्या क्रमांकावर असून जुनियर वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या नंबर वर आहे.