मुक्तपीठ टीम
भारतीय रेल्वे देशाच्या ईशान्य भागात रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यात सध्या व्यग्र आहे. यासाठी भारतीय रेल्वे ईशान्य चीन भुतान सीमेपर्यंत रेल्वे विस्तारण्याचा विचार करत आहे. भारतीय रेल्वे अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या सीमेपर्यंत सर्व राज्यांच्या राजधानींना जोडणारे रुळ टाकण्याची योजना आखत आहे. भारतीय रेल्वेची शेजारील देश भूतानपर्यंत जाण्याची योजना आहे जेणेकरून या भागात प्रवास सुलभ होईल. पण देशाच्या संरक्षणासाठी मोठा फायदा होईल.
भारतीय रेल्वेची ईशान्येकडील राज्यांना जोडण्याची योजना…
- भारतीय रेल्वे भालुकपोंग ते तवांग तसेच चीनच्या सीमेवरील सिलपथर ते अलॉन्ग व्हाया बामपर्यंत रेल्वे मार्ग तयार करणार आहे.
- हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर सीमावर्ती भागांना जोडले जाईल.
- भारतीय रेल्वेच्या माहितीनुसार, रेल्वेने प्रकल्पांच्या जागेच्या सर्वेक्षणाचे काम जोरात सुरू केले आहे.
- रेल्वे लाईनच्या बांधकामामुळे या भागांचे महत्त्व लक्षणीय वाढेल. कारण सीमावर्ती भागात रेल्वेच्या माध्यमातून फार कमी वेळात पोहोचता येते.
- ईशान्य सीमा रेल्वे क्षेत्र अरुणाचल प्रदेशसह ईशान्य प्रदेशांमध्ये नवीन रेल्वे प्रकल्प उभारण्याची योजना आखत आहे.
- नव्या योजने अंतर्गत भालुकपोंग ते तवांग आणि सिलापठार ते बामेमार्गे अलॉंग असा रेल्वेमार्ग टाकण्याची योजना आहे.
भारताचा चीनसोबत सीमावाद आहे. अशा परिस्थितीत येथे रेल्वेमार्ग आल्याने या परिसराचे महत्त्व वाढेल आणि कनेक्टिव्हिटीही सुलभ होईल. हा रेल्वे मार्ग अल्पावधीत सीमाभागांना जोडेल.