मुक्तपीठ टीम
भारतीय टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय पत्र-लेखन स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. कोणत्याही प्रभावशाली व्यक्तीला पत्र लिहीत ते हवामान संकट नियंत्रित करण्यासाठी का आणि कसे योगदान देऊ शकतात या विषयावर पत्र लिहायचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेते पत्र अधिकृतपणे भारताचे प्रतिनिधित्व करेल. भारतीय टपाल विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धेबाबत, ‘कू’ या सोशल मीडिया अॅपवर लिहिले की, जर तुम्ही घरबसल्या आंतरराष्ट्रीय पत्र लेखन स्पर्धा २०२२ मध्ये सहभागी होत असाल, तर तुमच्या सोशल मीडियावर तुमच्या लिखित पत्रासह सेल्फी घ्या. #LetterForABetterWorld हॅशटॅग वापरून तुमच्या पोस्टवर आम्हाला शेअर करा आणि टॅग करा.
स्पर्धेमध्ये ९ ते १५ वयोगटातील मुलांनी देश आणि जगातील प्रभावशाली व्यक्तींना पत्रे लिहून हवामान संकटावर का आणि कशी उपाययोजना करावी हे स्पष्ट करावे. स्पर्धेच्या माध्यमातून टपाल विभाग तरुणांना पत्रलेखनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि सामान्य ज्ञानासह जगभरातील हवामान संकटाबाबत जनजागृती आणि त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
टपाल विभागाचे पत्र लिहिण्याच्या स्पर्धेसाठीचे बक्षिसांचे नियोजन
- प्रादेशिक स्तरावरुन तीन उत्कृष्ट प्रवेशिका निवडून परिमंडळ स्तरावर पाठवल्या जातील.
- परिमंडळ स्तरावर, राज्यभरातील सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांना अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजारांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र दिले जाईल.
- येथून सर्वोत्कृष्ट तीन प्रवेशिका राष्ट्रीय स्तरावर समाविष्ट करण्यासाठी पोस्ट डायरेक्टरेट, नवी दिल्ली येथे पाठवल्या जातील.
- त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट तीन स्पर्धकांना अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १० हजारांचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक प्रमाणपत्र देण्यात येईल.
पाहा व्हिडीओ: