Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पवनदीप राजन बनला इंडियन आयडॉल १२व्या सिझनचा विजेता….महाराष्ट्रातील सायली कांबळे तिसऱ्या स्थानावर!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
indian idol

मुक्तपीठ टीम

इंडियन आयडॉल १२ व्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंकली आहे. रविवारी १५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडॉल १२ व्या सिझनचा ग्रँड फिनाले झाला. शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल, तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रातील सायली कांबळे तर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि शानमुखप्रिया चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पवनदीप राजनच्या या यशामुळे संपूर्ण भारतातच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन केले जात आहे.

या कार्यक्रमाचे परीक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायनल सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. पवनदीप राजनला शोची ट्रॉफी आणि २५ लाखांचे बक्षीस देखील देण्यात आले आहे. याशिवाय एक मारुती स्विफ्ट कार देखील पवनदीपला भेट देण्यात आली.

हा इंडियन आयडॉल हा गायनाच्या रिअलिटी शोचा १२वा सिझन होता. शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये रविवारी चुरस रंगली. यामध्ये पवनदीपने बाजी मारली. दुसऱ्या स्थानी अरुणिताने बाजी मारली. तर महाराष्ट्राच्या सायली कांबळेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

पवनदीपचा संगीतमय प्रवास…पर्वत शिखरांमधून यशोशिखराकडे!

  • पवनदीप राजनचा जन्म उत्तराखंडमधील चंपावत या झाला.
  • त्याचे वडील श्री सुरेश राजन स्वतः एक सुप्रसिद्ध सामान्य लोकगायक आहेत.
  • त्याची बहीण ज्योतिदीप राजन देखील गायिका आहे.
  • पवनदीपला गिटार, कीबोर्ड, तबला, पियानो आणि ढोलक सारखे वाद्य वाजवण्याचे देखील ज्ञान आहे.
  • पवनदीपने आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात टीव्हीवरूनच केली.
  • २०१५ मध्ये त्याने दूरदर्शनवरील रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया’मध्ये भाग घेतला होता आणि या शोमध्ये तो प्रसिद्ध गायक शानच्या टीममध्ये होता.
  • इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनमध्ये पवनदीपने बाजी मारली.

Tags: Indian Idol 12pawandeep rajanSayali kambleइंडियन आयडॉलपवनदीप राजनसायली कांबळे
Previous Post

“अमृतकालाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींच्या राज्यातील विषकालाचे काय?”

Next Post

“एकमेकाला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha CM

"एकमेकाला सहकार्य करत महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी करू": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!