मुक्तपीठ टीम
इंडियन आयडॉल १२ व्या सिझनची ट्रॉफी पवनदीप राजनने जिंकली आहे. रविवारी १५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडॉल १२ व्या सिझनचा ग्रँड फिनाले झाला. शोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अरुणिता कांजीलाल, तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रातील सायली कांबळे तर मोहम्मद दानिश, निहाल तरो आणि शानमुखप्रिया चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. पवनदीप राजनच्या या यशामुळे संपूर्ण भारतातच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन केले जात आहे.
या कार्यक्रमाचे परीक्षक सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, विशाल दादलानी, ग्रेट खली या सेलिब्रिटींनी या फायनल सिझनमध्ये आपला सहभाग नोंदवला. पवनदीप राजनला शोची ट्रॉफी आणि २५ लाखांचे बक्षीस देखील देण्यात आले आहे. याशिवाय एक मारुती स्विफ्ट कार देखील पवनदीपला भेट देण्यात आली.
हा इंडियन आयडॉल हा गायनाच्या रिअलिटी शोचा १२वा सिझन होता. शेवटच्या सहा स्पर्धकांमध्ये रविवारी चुरस रंगली. यामध्ये पवनदीपने बाजी मारली. दुसऱ्या स्थानी अरुणिताने बाजी मारली. तर महाराष्ट्राच्या सायली कांबळेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पवनदीपचा संगीतमय प्रवास…पर्वत शिखरांमधून यशोशिखराकडे!
- पवनदीप राजनचा जन्म उत्तराखंडमधील चंपावत या झाला.
- त्याचे वडील श्री सुरेश राजन स्वतः एक सुप्रसिद्ध सामान्य लोकगायक आहेत.
- त्याची बहीण ज्योतिदीप राजन देखील गायिका आहे.
- पवनदीपला गिटार, कीबोर्ड, तबला, पियानो आणि ढोलक सारखे वाद्य वाजवण्याचे देखील ज्ञान आहे.
- पवनदीपने आपल्या गायन कारकिर्दीची सुरुवात टीव्हीवरूनच केली.
- २०१५ मध्ये त्याने दूरदर्शनवरील रिअॅलिटी शो ‘द व्हॉइस इंडिया’मध्ये भाग घेतला होता आणि या शोमध्ये तो प्रसिद्ध गायक शानच्या टीममध्ये होता.
- इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीझनमध्ये पवनदीपने बाजी मारली.