Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सेनादलाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सलग चौथ्यांदा पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
indian Army 36th national game

मुक्तपीठ टीम

गुजरातमध्ये पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये  सेनादलाने  ६१ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३२ कांस्य पदके जिंकून पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. सशस्त्र दलांची उत्कृष्ट परंपरा कायम ठेवत, सेनादलाने सेना क्रीडा नियंत्रण मंडळाच्या (एसएससीबी) मार्गदर्शनाखाली स्पर्धेत धैर्य, कौशल्य आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवले आणि अभिमानास्पद कामगिरी करत  राजा भालिंद्र सिंग चषकावर आपले नाव कोरले. सेनादलाने राष्ट्रीय क्रीडा  स्पर्धांमध्ये सलग चौथ्यांदा हा चषक पटकावण्याचा मान मिळवला आहे.

१२ ऑक्टोबर २०२२ रोजी सूरत येथील पंडित दीनदयाल उपाध्याय इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सेना क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष एअर मार्शल के. अनथरामन आणि सेना क्रीडा नियंत्रण मंडळाचे  सचिव ग्रुप कॅप्टन   दिनेश सुरी यांना हा चषक प्रदान केला.  एअर मार्शल यांनी एसएससीबीच्या वतीने हा चषक देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सेवादलाच्या सर्व  जवानांना  समर्पित केला. सचिवांनी या उत्कृष्ट कामगिरीचे श्रेय सर्व खेळाडूंच्या शिस्त आणि समर्पित वृत्तीला  दिले.

एसएससीबी संस्थेची  स्थापना १९१९ मध्ये झाली आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या संस्थापक सदस्यांपैकी ही एक संस्था आहे. या वारशामुळेच एसएससीबीला इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेना या तिन्ही सेवांमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा  आणि जागतिक सेनादल  स्पर्धेत(World Military Games) सेनादलाचा  भाग म्हणून निवड होण्यासाठी आणि मैदानात उतरण्यासाठी आंतर-सेना  स्तरावर कठीण निवड प्रक्रियेतून सामोरे जावे लागते.

पाहा व्हिडीओ:


Tags: 36th National Game36th National Game 2022good newsGood news MorningGujaratIndian Armyगुजरातगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
Previous Post

चंद्रावर २०२५पर्यंत शास्त्रज्ञांद्वारे रोपं लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार, मानवी वस्ती स्थापन करण्याची तयारी!

Next Post

ऋतुजा रमेश लटकेंना अखेर दिलासा! राजीनामा रोखण्यामागे काय होते, नियम की कपट?

Next Post
ऋतुजा रमेश लटकेंना अखेर दिलासा! राजीनामा रोखण्यामागे काय होते, नियम की कपट?

ऋतुजा रमेश लटकेंना अखेर दिलासा! राजीनामा रोखण्यामागे काय होते, नियम की कपट?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!