मुक्तपीठ टीम
टी २० क्रिकेट विश्वचषकाचा सर्वात मोठा सामना संध्याकाळी दुबई क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांना सामोरे येतात. दोन्ही देशांदरम्यान क्रिकेटचा सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी युद्धासारखा अनुभव असतो आजच्या सामन्याच्यानिमित्ताने हा सामना जिथे रंगणार आहे, त्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमचा आणि तेथे आजवर झालेल्या सामन्यांचा आढावा.
नाणेफेक महत्त्वाची ठरणार!
- संघाच्या गोलंदाजीला दवामुळे अडचणी येऊ शकतात.
- टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही दव घटक लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी किंवा नंतर फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
The world is watching.
Tonight in Dubai, India and Pakistan go toe-to-toe.#INDvPAK | #T20WorldCup pic.twitter.com/ynIzBry0ha
— ICC (@ICC) October 24, 2021
दुबईची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल
- दुबईला झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल होती आणि भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही तेच घडण्याची अपेक्षा सर्वांना आहे.
- मधल्या षटकांमध्ये खेळाची गती नियंत्रित करण्याची जबाबदारी फिरकीपटूंची असेल.
- त्यानुसार दोन्ही संघ अंतिम ११ मध्ये निवडले जातील.
It’s here.#India and #Pakistan against each other in #T20WorldCup action tonight in Dubai! pic.twitter.com/2C6IhSXf14
— ICC (@ICC) October 24, 2021
एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने १२ वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तान पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. जवळ जवळ भारताने पाकिस्तानविरुद्ध शंभर टक्के विजयाची नोंद केली आहे. दुबई क्रिकेट स्टेडियमही चर्चेत आहे, आतापर्यंत तेथे ६१ टी -२० सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक विजय मिळवल्याची नोंद आहे.
दुबई क्रिकेट स्टेडियममधील सामन्यांमधील कामगिरी• आजवर एकूण ६१ टी -२० सामने
- प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी: ३४
- संघाची फलंदाजी नंतर जिंकली: २६
- पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या: १४४
- दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या: १२२
- श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध २११/३ धावांची नोंद करुन सर्वोच्च धावसंख्या केल्या
- केनियाने आयर्लंडविरुद्ध ७१/१० धावांची नोंद करुन किमान धावसंख्या केल्या
- यूएई अफगाणिस्तान विरुद्ध १८३/५ सर्वाधिक धावांचा नोंद केला
- हाँगकाँग ओमान विरुद्ध १३४/७ सर्वात कमी स्कोअर केला