मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमध्ये तब्बल सात दिवस युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत आहे, त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून तिथे नुकसानही प्रचंड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांमध्ये चर्चेसाठी बुधवारी चर्चेची दुसरी फेरी आहे. दरम्यान, भारतीय वंशाचे रशियन आमदार डॉ.अभय कुमार सिंग यांनी युक्रेनवरील रशियन हल्ल्याचे समर्थन असून की ही लष्करी कारवाई न्याय्य आहे, असे म्हटले आहे. कारण युक्रेनला पुरेसा वेळ देण्यात आला होता. युक्रेनमधील भारतीयांवर झालेल्या हल्ल्याला त्यांनी सूड म्हणून संबोधले. तसेच त्यांनी चीनने बांगलादेशात लष्करी तळ उभारल्यास भारताची प्रतिक्रिया काय असेल? भारताला हे कोणत्याही परिस्थितीत आवडणार नाही, हे स्पष्ट केले आहे.
डॉ. अभय सिंग म्हणाले की, चीनने बांगलादेशात लष्करी तळ उभारल्यास भारताची प्रतिक्रिया काय असेल? भारताला हे कोणत्याही परिस्थितीत आवडणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे रशियाच्या विरोधात नाटोची निर्मिती झाली आणि सोव्हिएत युनियनमधील भाग विलिन झाले. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास ते नाटो सैन्याला आपल्या जवळ आणेल, कारण युक्रेन आपला शेजारी आहे. हा कराराचा भंग असेल. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि रशियन संसदेला कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळेच युक्रेनवर हल्ला झाला.
आण्विक शस्त्रांच्या हल्ल्याची अटकळ फेटाळली
- त्यांनी स्पष्ट केलं की, आण्विक शस्त्रांच्या युद्धाभ्यासाचा उद्देश अन्य देशांनी रशियावर हल्ला केल्यास उत्तर देण्यास सज्ज असणं, हा होता.
- आण्विक शस्त्रांबाबत काळजी करण्यासारखे काही नाही.
- राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले की अण्वस्त्रांचा केवळ रशियावर हल्ला करणार्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी होत्या.
- जर इतर कोणत्याही देशाने आपल्यावर हल्ला केला तर रशिया त्याला सर्वप्रकारे प्रत्युत्तर देईल.
- युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत डॉ.सिंग म्हणाले की, भारत युक्रेनला पाठिंबा देत नसल्याने हा बदला असू शकतो.
डॉ.अभय सिंग मूळचे पाटणाचे
- डॉ.अभयकुमार सिंग हे मूळचे पाटणाचे रहिवासी आहेत.
- ते रशियाच्या पश्चिमेकडील कुर्स्क शहराचे आमदार आहेत.
- ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये ते वैद्यकिय शिक्षणासाठी रशियाला गेले होते.
- पाटणा येथील लोयोला हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले.
- त्यांनी रशियाच्या कुर्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पदवी पूर्ण केली.
- त्यानंतर ते डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी पाटण्याला परतले.
- तथापि, काही काळानंतर ते रशियाला परतला.
- तिथे त्यांनी स्वतःचा औषधी व्यवसाय सुरू केला.
- नंतर त्यांनी रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्रात पाऊल ठेवले.