Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचं प्रदूषणमुक्तीकडे पाऊल, कार्बन उत्सर्जन २००५च्या तुलनेत २८% कमी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
pollution

मुक्तपीठ टीम

भारताने २००५च्या स्तराच्या तुलनेत २८% कार्बन उत्सर्जन कमी करणे साध्य केले आहे. खरं तर २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन ३५% कमी करण्याचे राष्ट्रीय लक्ष्य ठरवण्यात आले आहे. यामुळे नविकरणीय उर्जा क्षमतेत झपाट्याने वाढ करतानाच पॅरिस हवामान बदल ( सीओपी२१ ) परिषदेत व्यक्त करण्यात आलेल्या कटीबद्धतेची पूर्तता करणाऱ्या जगातल्या मोजक्या देशात भारताची गणना होत आहे.

 

केंद्रीय ऊर्जा आणि नविकरणीय मंत्री आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आर के सिंह यांनी भारत- आंतरराष्ट्रीय सौर आघाडी उर्जा संक्रमण संवाद २०२१ मध्ये बीज भाषण करताना ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि केंद्रीय नविकरणीय ऊर्जा मंत्रालयाने हा संवाद आयोजित केला होता.

 

गेल्या दोन दशकांपासून कल्पक बाजारपेठ यंत्रणा आणि व्यापार मॉडेल, संस्थात्मक बळकटी आणि क्षमता उभारणी तसेच मागणी निर्मितीसाठी उपाययोजनांद्वारे भारत ऊर्जा क्षमता सुधारणा धडाक्याने राबवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

भारताची क्षमता आणि संकल्प

  • २०५० पर्यंत भारताच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी ८०-८५% उर्जा नविकरणीय स्त्रोतातून येईल अशी अपेक्षा आहे.
  • १०० गिगावॅट स्थापित नविकरणीय ऊर्जा क्षमता साध्य केली गेली आहे.
  • नविकरणीय ऊर्जा क्षमतेत जगात भारताचा चौथा क्रमांक तर सौर ऊर्जेत पाचवा आणि पवन ऊर्जा क्षमतेत चौथा क्रमांक आहे.

 

२०३० पर्यंत ४५० गिगावॅट नविकरणीय उर्जेचे उद्दिष्ट

  • स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातली ही गती अशीच कायम राखण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
  • यासाठी २०२२ पर्यंत १७५ गिगावॅटचे सध्याचे उद्दिष्ट वाढवून २०३० पर्यंत ४५० गिगावॅट नविकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट करण्याची योजना आहे.
  • खाजगी क्षेत्राच्या सक्रीय सहभागाने पुरवठाविषयक बाजू बळकट होत असल्याचे ते म्हणाले.

 

महत्वाच्या विषयावर चर्चा घडवत उच्च नविकरणीय ऊर्जा आणि वास्तव ऊर्जा संक्रमण सुलभ करण्यासाठीचे मार्ग यावरही देशांनी चर्चा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या संवाद दरम्यान दोन पॅनेल चर्चा झाल्या. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य देश, वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातले प्रतिनिधी, संशोधक आणि जगभरातल्या विविध वित्तीय संस्थाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Tags: pollution free indiaउच्च नविकरणीय ऊर्जाकार्बन उत्सर्जन
Previous Post

हुतात्मा राजगुरु यांची प्रेरणादायी वास्तू विद्युत रोषणाईने उजळली

Next Post

गडकरीनंतर आता ज्योतिरादित्य शिंदे! महाराष्ट्रातील विमानतळ विकासातील अडथळ्यांबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

Next Post
uddhav thackeray & jyotiraditya shinde

गडकरीनंतर आता ज्योतिरादित्य शिंदे! महाराष्ट्रातील विमानतळ विकासातील अडथळ्यांबद्दल मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!