Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका भारतीय कंपनीचं वेगळं पाऊल…महिन्याला नाही दर आठवड्याला पगार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
India Mart

मुक्तपीठ टीम

सरकारी नोकरी असो किंवा खासगी नोकरी. आपल्या देशात कर्मचाऱ्यांना पगार मात्र मिळतो तो महिन्याच्या शेवटी किंवा सुरूवातीला. ज्या गोष्टीसाठी दिवस-रात्र मेहनत करतो त्याची महिनाभर वाट पाहावी लागते. पण आपल्या कर्मचाऱ्यांची सोय लक्षात घेऊन इंडिया मार्ट कंपनीने ‘वीकली सॅलरी पे पॉलिसी’ जाहीर केली आहे. इंडिया मार्ट ही बी२बी ई-कॉमर्स कंपनी आहे. तिच्या कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्यासाठी नवीन वेतन धोरण जाहीर केले आहे.

 

कंपनीची फेसबुक पोस्टद्वारे घोषणा

फ्लेक्सिबल वर्क कल्चर निर्माण करण्यासाठी आणि कर्मचार्‍यांचे आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी साप्ताहिक वेतन देय धोरण स्वीकारणारी इंडिया मार्ट ही भारतातील पहिली संस्था बनली आहे. असे इंडिया मार्टने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

 

आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जाण ठेवत, इंडिया मार्टचा मोठा निर्णय

  • साप्ताहिक पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
  • कंपनीने या पोस्टसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. “तुमचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी उचललेले पाऊल” असे त्या फोटोद्वारे सांगण्यात आले आहे.
  • ही प्रणाली काही देशांमध्ये आधीच लागू करण्यात आली आहे.
  • साप्ताहिक पगार पेमेंट कर्मचार्‍यांच्या निरोगीपणाला चालना देण्यासाठी एक पाऊल असल्याचे म्हटले जाते.
  • या योजनेला तासांनुसार काम करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय मानला जातो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि अमेरिकेमध्ये हे आधीच सामान्य आहे.
  • भारतात आतापर्यंतच्या सामान्य पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी पगार मिळतो.

 

इंडिया मार्ट कोणता व्यवसाय करते?

  • इंडिया मार्ट ही भारतातील सर्वात मोठ्या बी२बी ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक आहे.
  • हे खरेदीदारांना विक्रेत्यांशी जोडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.
  • या कंपनीची सुरूवात १९९९ मध्ये झाली आणि व्यवसाय सोप्या पद्धतीने करणे हे या कंपनीचे ध्येय आहे.
  • कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध डेटानुसार, सध्या या प्लॅटफॉर्मवर १४३ दशलक्ष खरेदीदार अॅक्टिव्ह आहेत तर, ७० लाख सप्लायर अॅक्टिव्ह आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: B2B e-commerce companygood newsIndia MartIndian companymuktpeethWeekly Salary Pay Policyइंडिया मार्टचांगली बातमीबी२बी ई-कॉमर्स कंपनीभारतीय कंपनीमुक्तपीठवीकली सॅलरी पे पॉलिसी
Previous Post

उत्तरप्रदेशची एक उमेदवार अशीही…फिटनेसनं लाजवेल बॉलिवूड स्टार्सनाही!

Next Post

शंभर नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांसाठी ई-समुपदेशन

Next Post
military schools

शंभर नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांसाठी ई-समुपदेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!