Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शंभर नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी इच्छूक विद्यार्थ्यांसाठी ई-समुपदेशन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
military schools

मुक्तपीठ टीम

सौनिकी शाळा म्हटलं की दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीची हमी. त्यामुळे अनेक पालकांचा कल या सैनिकी शाळांमध्ये मुलांना शिकवण्याकडे असतो. मात्र, तेथे प्रवेश मिळवणे तसे सोपे नसते. त्यामुळे देशभरातील १०० नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. त्या उद्दिष्टानुसार सैनिक स्कूल सोसायटीने प्रवेशप्रक्रियेसाठी ई-समुपदेशनाची सोय केली आहे. त्यासाठी स्वयंचलित प्रणाली विकसित केली जात आहे.

 

सैनिक शाळांमध्ये प्रवेशासाठी ई-समुपदेशन पध्दतीला प्रथमच आरंभ होत आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे वाटचाल करण्याची संधी असेल. तशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नवीन सैनिकी शाळांसाठी ही प्रणाली लागू होईल.

 

प्रक्रिया

  • सैनिक स्कूल सोसायटी (SSS) विद्यार्थ्यांना ई-समुपदेशनासाठी अर्ज करण्याची माहिती देण्यासाठी वेळोवेळी व्यापकपणे प्रसिद्धी देईल.
  • सैनिक स्कूल सोसायटी (SSS) ने वेळोवेळी जाहीर केलेल्या पात्रतेपेक्षा अधिक गुण असणाऱ्या वैयक्तिक अर्जदार विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा मोबाईल नंबर द्वारे एक लिंक पाठवली जाईल.
  • त्याच वेळी, नवीन सैनिक शाळांना श्रेणी आणि लिंगनिहाय माहिती तसेच रिक्त पदांची संख्या उपलब्ध करण्यासाठी योग्य ती संधी प्रदान केली जाईल.
  • विद्यार्थ्यांना www.sainikschool.ncog.gov.in या वेब पोर्टलवर दिलेल्या लिंकद्वारे नोंदणी करण्यास आणि त्यांच्या तपशीलांची पडताळणी करण्यास सांगितले जाईल.
  • विद्यार्थ्यांना १० शाळा निवडण्याचा पर्याय दिला जाईल.
  • त्यानंतर, विद्यार्थ्यांना शाळांचे वाटप त्यांच्या श्रेणी आणि शाळांच्या निवडीच्या आधारे केले जाईल आणि ई-समुपदेशन पोर्टलद्वारे निकाल घोषित केला जाईल.
  • अर्जदार विद्यार्थ्याला दिलेली शाळा स्वीकारणे आवश्यक आहे किंवा समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीच्यावेळी विचार केला जाणारा पर्याय सूचित करणे आवश्यक आहे किंवा पुढील विचारासाठी इच्छुक नाही, असे कळवावे लागेल.
  • ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवडी स्वीकारल्या/नक्की केल्या आहेत त्यांना प्रत्यक्ष पडताळणीच्या तारखा कळवल्या जातील.

 

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतर त्यांचा डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी नवीन सैनिक शाळांना रिअल टाईम आधारावर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पर्यायाची निवड नक्की केली आहे, त्यांची यादी दिसेल. तसेच , निश्चित तारीख आणि वेळेनंतर जागा भरल्या नाहीत तर पहिल्या फेरी-I नंतर समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीद्वारे -II भरल्या जातील. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरी-१ मध्ये जागा स्वीकारल्या नाहीत/निवड निश्चित केली नाही, त्यांना ई-समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीत -II उर्वरित जागा निवडण्याचा पर्याय दिला जाईल.

 

लाभ

ई-समुपदेशनासाठी ही स्वयंचलित प्रणाली प्रवेश प्रक्रियेतील संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करेल. ही प्रक्रिया सर्व हितसंबंधित शाळा, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी कमी खर्चिक आणि वापरण्यास सानुकूल अशी असेल. यामुळे संपूर्ण प्रक्रियेचे रिअल-टाइम मॉनिटरिंग होईल आणि प्रत्येक टप्प्यावर आवश्यक कृती देखील करता येईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: admissionE-counselinggood newsmilitary schoolsmuktpeethsainikschoolSoldier School Societyई-समुपदेशनचांगली बातमीमुक्तपीठसैनिक स्कूल सोसायटीसौनिकी शाळा
Previous Post

एका भारतीय कंपनीचं वेगळं पाऊल…महिन्याला नाही दर आठवड्याला पगार!

Next Post

बाउन्स इन्फिनिटीची कमाल, दहा लाख ईव्ही बॅटरी स्वॅप्सचा टप्पा पार!

Next Post
Bounce infinity

बाउन्स इन्फिनिटीची कमाल, दहा लाख ईव्ही बॅटरी स्वॅप्सचा टप्पा पार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!