Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विमानांची प्रवासी क्षमता वाढवली, प्रवास वाढणार, स्वस्तही होणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
aircraft

मुक्तपीठ टीम

हवाई प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार आता विमानांच्या क्षमतेच्या ८५ टक्के प्रवाशांसह हवाई प्रवासाची परवानगी असेल. पूर्वी ही मर्यादा ७२.५ टक्के होती. नागरी उड्डयन मंत्रालयाचा हा आदेश १८ सप्टेंबरपासून लागू झाला आहे. त्यामुळे आता प्रवाशांची संख्या वाढेलच, पण नव्या नियमांमुळे किमान दरानेही प्रवास करता येणाराय. प्रवाशी संख्या वाढल्याने अधिक जास्त प्रवाशी विमानांकडे वळण्याची शक्यताय.

 

दर महिन्याला हवाई प्रवाशांमध्ये वाढ

  • कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीपासून उड्डाणांची गती मंदावली होती.
  • परंतु, परिस्थिती सुधारल्यानंतर प्रवाशी मे २०२०पासून पुन्हा एकदा हवाई प्रवासाकडे वळले.
  • मे २०२० ते मार्च २०२१ पर्यंत दर महिन्याला हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली.
  • कोरोना दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा हवाई वाहतुकीला फटका बसला होता. परंतु हळूहळू स्थिती सुधारत आहे.

 

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ६७ लाख प्रवाशांनी ऑगस्टमध्ये विमान प्रवास केला. तर जुलैमध्ये ही संख्या फक्त ५ लाख एक हजार होती. ही संख्या पाहता सरकारने आता विमानांची प्रवाशी क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या काही उद्योगांमध्ये विमान क्षेत्र देखील आहे. सरकारच्या या निर्णयाचा चांगला परिणाम होईल अशी अपेक्षा आहे.

 

पंधरा दिवसांपर्यंतचे भाडे ठरवता येणे शक्य असेले

  • नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले की, विमान भाड्याच्या किमान आणि कमाल मर्यादा कोणत्याही वेळी १५ दिवसांसाठी लागू राहतील आणि विमान कंपन्या १६ व्या दिवसापासून कोणत्याही मर्यादेशिवाय भाडे आकारतील.
  • या वर्षी १२ ऑगस्टपासून लागू झालेली ही व्यवस्था सध्या ३० दिवसांसाठी होती आणि विमान कंपन्या ३१ व्या दिवसापासून कोणत्याही मर्यादेशिवाय भाडे आकारत होत्या.
  • शनिवारी जारी केलेल्या नवीन आदेशात मंत्रालयाने म्हटले आहे, समजा आज तारीख २० सप्टेंबर आहे, तर ४ ऑक्टोबरपर्यंत भाडे मर्यादा लागू असेल.
  • अशा प्रकारे, ५ ऑक्टोबर रोजी किंवा नंतरच्या प्रवासासाठी २० सप्टेंबर रोजी केलेली बुकिंग भाडे मर्यादेद्वारे नियंत्रित केली जाणार नाही.
  • जर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी बुकिंग केले गेले तर भाडे मर्यादा ५ ऑक्टोबरपर्यंत लागू होईल आणि ६ ऑक्टोबर रोजी किंवा नंतरच्या प्रवासासाठी भाडे मर्यादा लागू होणार नाही.

 

कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर २५ मे २०२० रोजी फ्लाइट सेवा पुन्हा सुरू झाल्यावर भारताने फ्लाइटच्या कालावधीच्या आधारावर भाड्याची कमी आणि वरची मर्यादा निश्चित केली होती. यावर्षी १२ ऑगस्ट रोजी देशांतर्गत हवाई प्रवास महाग झाला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने भाड्याच्या खालच्या आणि वरच्या मर्यादा ९.८३ वरून १२.८२ टक्के केल्या होत्या.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aircraftcoronaनागरी उड्डाण मंत्रालयहवाई प्रवास
Previous Post

यवतमाळमधील सर्वात मोठ्या धरणाचे आकाशातून विहंगम दृश्य

Next Post

कॅटचा चांगला निर्णय, पालकांच्या निवृत्ती वेतनावर घटस्फोटित मुलींचाही अधिकार

Next Post
Cat

कॅटचा चांगला निर्णय, पालकांच्या निवृत्ती वेतनावर घटस्फोटित मुलींचाही अधिकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!