मुक्तपीठ टीम
मर्सिडीज-बेंझही जर्मन लक्झरी कार निर्माता कंपनी आहे. हा ब्रँड लक्झरी ऑटोमोबाईल्स, कारसाठी वापरला जातो. मर्सिडीज-बेंझच्या भारतातील ब्रांचने या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कारच्या विक्रीत ६८ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे.
कंपनीच्या विक्रित २८ टक्क्यांनी वाढ…
- कंपनीने एकूण ११,४६९ युनिट्सची विक्री केली आहे.
- मर्सिडीज-बेंझ इंडियाने २०२१ मध्ये एकूण ११,२४२ युनिट्स विकल्या.
- टॉप उत्पादन विभाग ६८ टक्क्यांनी वाढला आहे.
- कंपनीची विक्री एकूण २८ टक्क्यांनी वाढली आहे.
- १ कोटी रुपयांच्या वरच्या कारची विक्री एकूण विक्रीच्या ३० टक्के आहे.
- १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वाहनांची मागणी ४० टक्क्यांहून अधिक झाली असती परंतू ७,००० युनिट्स ऑर्डर प्रलंबित आहेत.
कंपनीचे उपाध्यक्ष संतोष अय्यर यांनी स्पष्ट केले की, मर्सिडीज-बेंझच्या मॉडेल्सच्या विक्रीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे. जानेवारी-सप्टेंबर २०२२ या कालावधीत विकल्या गेलेल्या एकूण वाहनांपैकी ३० टक्के कारचा वाटा होता.