Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकर झाडाझडती…अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचं कारण?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
buldhana

मुक्तपीठ टीम

आशिया खंडातील सर्वात मोठी असलेली पतसंस्था म्हणजे बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. या पतसंस्थेवर आयकर विभागाची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती सुरुच आहे. मंत्री अशोक चव्हाणांशी संबंधित चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाप्रकरणी आयकर खात्याकडून बुलडाणा अर्बनची चौकशी सुरु असल्याची चर्चा आहे. बुधवारी सकाळपासून ११ जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं होतं.

 

नेमकं प्रकरण काय?

  • सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये आयकर विभागाने मागील दोन दिवसांपासून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे.
  • २७ ऑक्टोबरपासून ही कारवाई सुरु आहे.
  • महाविकास आघाडीतील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हण यांच्या नांदेड जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जासंदर्भात ही तपासणी असल्याची माहिती आहे.
  • त्यामुळे अशोक चव्हाण हे आयकर खात्याच्या रडारवर असलयाचे बोलले जाते.

 

आयकर विभागाचा घटनाक्रम

  • बुलडाणा अर्बनच्या मुख्य शाखेत बुधवारी सकाळपासून एक ११ जणांचं आयकर विभागाचं पथक पतसंस्थेत दाखल झालं होतं.
  • या पतसंस्थेमार्फत झालेल्या काही विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं होतं.
  • रात्रभर हे पथक बुलढाणा अर्बनच्या मुख्य कार्यालयात विशेष आर्थिक व्यवहारांची चौकशी करत होतं.
  • तसेच सलग दुसऱ्या रात्रीही या पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली.
  • दरम्यान बुलढाणा अर्बनच्या मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
  • आयकर विभागाच्या पथकाकडून या पतसंस्थेतंर्गत झालेल्या व्यवहारांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
  • पथकातील सर्व अधिकारी वर्ग हा परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
  • आयकर विभागाच्या एसटीएफ विभागाकडून हे सर्व्हेक्षण सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
  • प्रामुख्यानं उच्च-मूल्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी, प्राप्तिकर कायद्याने आर्थिक व्यवहारांचं विवरण किंवा अहवाल करण्यायोग्य खात्यांचे प्रामुख्येने हे सर्व्हेक्षण होत असल्याची माहिती मिळाली आहे

 

आशियातील सर्वात मोठी पतसंस्था

  • आशियातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणजे बुलडाणा अर्बन.
  • ही पतसंस्था बरीच मोठी असून ५ राज्यात ४६५ शाखांचा कारभार चालतो.
  • पतसंस्थेने १० हजार ठेवींचा विक्रम पार केला.
  • ६०० च्या वर वेअर हाऊस आहेत.
  • ५००० कर्मचारी काम करतात.
  • या पतसंस्थेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत.
  • संस्थेचे अनेक कोल्ड स्टोरेज असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल साठवणूक आणि योग्य भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करत असते.
  • संस्थेसोबत बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा आहे.
  • ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, २२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि १८०० कर्मचारी आहेत.
  • शिवाय लवकरच बुलडाणा अर्बन परिवार राज्यातील ३ साखर कारखाने कार्यान्वित करणार आहे.

 

हे ही वाचा: बुलढाणा अर्बन पतसंस्था… एका जिल्ह्यातील पतसंस्था, पण बँकांनाही मागे टाकणारी प्रगती!


Tags: Ashok Chavanincome tax raidअशोक चव्हाणबुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
Previous Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी ७३ जागांवर संधी, १० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

Next Post

छोटा राजनची ३८ वर्षे जुन्या गुन्ह्यातून सुटका! समजून घ्या सुटकेची कारणं….

Next Post
chhota rajan

छोटा राजनची ३८ वर्षे जुन्या गुन्ह्यातून सुटका! समजून घ्या सुटकेची कारणं....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!