Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोटा राजनची ३८ वर्षे जुन्या गुन्ह्यातून सुटका! समजून घ्या सुटकेची कारणं….

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
chhota rajan

मुक्तपीठ टीम

मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी माफिया डॉन छोटा राजनची सुटका केली आहे. अडतीस वर्षांपूर्वी दोन पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता. छोटा राजनविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे वर्ग केला होता. त्याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानुसार त्याची सुटका झाली आहे. जवळजवळ चार दशकांपूर्वीच्या प्रकरणात झालेली सुटका नेमकी कशामुळे शक्य झाली, ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

 

  • विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी राजनला त्याच्यावरील आरोपांमधून सुटका केली.
  • न्यायालयाचे कामकाज हे समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे चालते.
  • हा गुन्हा ३८ वर्षांपूर्वीचा होता. तारखा पडत राहिल्या पण सुनावणी सुरु झाली तेव्हा वेगळ्याच अडचणी आल्या.
  • खटल्याशी संबंधित बहुतांश साक्षीदारांचा ठावठिकाणा सापडत नसल्याने साक्षी होऊ शकल्या नाहीत.
  • या प्रकरणाची कागदपत्रेही गहाळ झाल्याचे तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले.
  • त्यामुळेच सीबीआयने क्लोजर रिपोर्टही सादर केला होता.

 

सीबीआयने सादर केला क्लोजर रिपोर्ट

या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे गहाळ असून साक्षीदारही गायब असल्याचे सीबीआयने म्हटले होते.

 

दारु नेताना रोखणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याचा आरोप

न्यायालयाने एजन्सीला तपास सुरू ठेवण्यास सांगितले होते. १९८३ मध्ये पोलिसांनी एक टॅक्सी थांबवली होती. या टॅक्सीत राजन आणि त्याचे साथीदार दारूची तस्करी करत होते. दोन पोलिसांनी टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, अटक करण्यापूर्वी राजनने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

सध्या राजन तिहार तुरुंगात!

२०१५ मध्ये इंडोनेशियातून आणल्यानंतर राजनला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. राजनवर सुमारे ७० खटले सुरू आहेत. २०११ मध्ये पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षाही झाली होती.


Tags: CBIChhota Rajanकेंद्रीय अन्वेषण विभागछोटा राजनविशेष सीबीआय न्यायालय
Previous Post

बुलढाणा अर्बन पतसंस्थेची आयकर झाडाझडती…अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचं कारण?

Next Post

पाणीपुरीवरून भांडण, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला बाल्कनीत पाय पकडून उलटे लटकवले!

Next Post
mirzapur principal

पाणीपुरीवरून भांडण, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला बाल्कनीत पाय पकडून उलटे लटकवले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!