Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी खरंच आयटीचा नेम चुकला? आता ‘समाजवादी’ अत्तरवाल्यावरही आयकर धाड!

कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी पुष्पराज जैन यांच्या घरावर आयकर छापा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
pushparaj jain and Akhilesh yadav

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील कनौजचे अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्याकडे कोट्यवधीची रोकड सापडल्यानंतर भाजपा नेत्यांनी त्यांचा संबंध समाजवादी पार्टीशी जोडला होता. त्यांनीच ‘समाजवादी’ या ब्रँडनेमने अत्तर लाँच केल्याचा दावाही करण्यात आला होता. पुढे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तो दावा चुकीचा ठरवत ‘समाजवादी’ अत्तर पियुष जैन यांनी नाही तर समाजवादी पार्टीचे विधान परिषदेतील आमदार आणि अत्तर व्यापारी पुष्पराज जैन यांनी लाँच केल्याचे उघड केले होते. आता आयकर खात्याच्या पथकांनी पुष्पराज जैन उर्फ पंपी जैन आणि अयुब मियाँ यांच्या निवासस्थानावर आणि कारखान्यांवर छापे टाकले आहेत.

 

परफ्यूम व्यावसायिक पुष्पराज जैन अखिलेश यादव यांच्या जवळचे मानले जातात. त्यांनी नुकतेच ‘समाजवादी’ ब्रँडनेमने अत्तर लाँच केले होते. तेव्हापासून ते भाजपाच्या रेंजमध्ये आले होते. पण गेल्या आठवड्यात कनौजमधील अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्यावर आयकर खात्याची धाड पडली. त्यांच्याकडे कोट्यवधीचा काळा पैसा, सोनेही मिळाल्याच्या बातम्या आल्या. तेव्हा भाजपाने ते समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्या जवळचे असून त्यांनीच समाजवादी अत्तर लाँच केले होते, असेही म्हटले. त्यानंतर अखिलेश यादव यांनी खुलासा करत ते हे अत्तर व्यापारी नसून भाजपाची आणि आयकर खात्याची नेम धरण्यात चूक झाल्याचे म्हटले. पण आज अखिलेश कन्नौजमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी येत असतानाच त्यांनी ज्यांचा उल्लेख केला त्या पुष्कराज जैन यांच्यावरही आयकर खात्याची धाड पडली.

 

समाजवादी पार्टीचा भाजपावर आरोप

  • समाजवादी पक्षाने एमएलसी अत्तर व्यापारी पुष्पराज जैन उर्फ पंपी यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल भाजपावर आऱोप केले आहेत.
  • समाजवादी पार्टीने ट्विट हल्ला करताना लिहिले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कन्नौजमध्ये पत्रकार परिषदेची घोषणा करताच भाजप सरकारने सपा आमदार पुंपी जैन यांच्यावर आयकर धाड घातली. भाजपाची भीती आणि राग स्पष्ट आहे. जनता भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे.

Tags: BJPIncome Tax Departmentkannaujpushparaj jainsamajwadi partyकन्नौजपुष्पराज जैनसमाजवादी पार्टी
Previous Post

धोकादायक आणि जीर्ण पूलांसाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार

Next Post

भालगाव व वडाळा महादेव येथील पी.बी.बी.एसस्सी. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ

Next Post
shiva trust college of nursing aurangabad

भालगाव व वडाळा महादेव येथील पी.बी.बी.एसस्सी. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!