Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूर येथे भारतीय महसूल सेवेच्या ७६व्या तुकडीचे प्रवेशपूर्व प्रशिक्षण

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Inauguration of Induction Training of the 76th Batch of Indian Revenue Service

मुक्तपीठ टीम

सचोटी, नम्रता, नैतिकता आणि लोकसेवक म्हणून बांधिलकीची भावना हे घटक प्रशिक्षणार्थी अधिकारी यांनी आत्मसात केले पाहिजे. पारदर्शकता, प्रगतीशील कर आकारणी आणि ऐच्छिक अनुपालन या मूल्यांसह आयकर विभाग नव्या  दृष्टीकोनातून काम करत असून फेसलेस योजना आणि चांगल्या कर सेवांसाठी विभागांच्या इतर प्रमुख उपक्रमानांही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या सदस्या श्रीमती. अनुजा सारंगी यांनी केले. भारतीय महसूल सेवेतील ५९ आय आर एस अधिकारी आणि रॉयल भूतान सेवेतील  ०२ अधिकाऱ्यांच्या ७६व्या तुकडीसाठी प्रवेश प्रशिक्षणाचा  उद्घाटन सोहळा  आज राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस – एनएडीटी  नागपूर येथे झाला,याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.  याप्रसंगी एनएडीटी नागपूरचे प्रमुख महासंचालक संजय पुरी उपस्थित होते.

सारंगी  यांनी प्रारंभीच  संबोधित करताना, अधिकारी प्रशिक्षणार्थींचे भारतीय महसूल सेवेत प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. भारतीय महसूल सेवेची भूमिका आणि सरकारच्या धोरण निर्मितीमध्ये आयकर विभागाचे महत्त्व  त्यांनी अधोरेखित  केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर ही भारत सरकारच्या भारतीय महसूल सेवा अधिकाऱ्यांसाठी असणारी  सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे.  नागरी सेवा परीक्षेद्वारे भरती झालेले आयआरएस अधिकारी १६ महिन्यांचे प्रवेश पुर्व प्रशिक्षण घेतात.  प्रशिक्षणादरम्यान, अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर प्रशासनाच्या विविध पैलूंवर प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना प्राप्तिकर कायदे, न्यायशास्त्र तसेच संबंधित कायदे, सामान्य कायदे आणि व्यवसाय कायदे यासंबंधी विशेष माहिती दिली जाते.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना वित्त  आणि लेखा प्रणालीवर सखोल प्रशिक्षण दिले जाते.   प्रशिक्षणार्थींना करचोरी आणि मनी लाँड्रिंगसह कर प्रकरणे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये तपासासाठी तयार करण्यासाठी फायनान्शियल फॉरेन्सिक्स आणि सायबर फॉरेन्सिक्समधील तपशील देखील दिले जातात.  प्रशिक्षणार्थी यांना  विशेषतः करदाता सेवा आणि इतर सार्वजनिक सेवा तसेच माहितीचा अधिकार इत्यादींबाबत संवेदनशील केल जाते. प्रशिक्षणाच्या व्यावहारिक बाबींमध्ये आयकर विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांशी तसेच संसदेसह भारतातील विविध संवैधानिक संस्था तसेच आरबीआय , एसबीआय , एनएसडीएल सारख्या  वैधानिक संस्थांशी ॲटेचमेंट कार्यक्रमांचाही  समावेश यात असतो.

७६व्या तुकडीत २५ महिलांसह (४१% प्रमाण ) ६१ अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.  बॅचचे ३८% अधिकारी प्रशिक्षणार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतील आहेत आणि उर्वरित शहरी किंवा निमशहरी पार्श्वभूमीतील आहेत.  अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचा संबंध आहे, सुमारे २/३ अधिकारी प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत.  सुमारे अर्ध्या बॅचसाठी ही त्यांची पहिलीच नोकरी आहे.

अधिकारी प्रशिक्षणार्थींना कर अधिकारी म्हणून काम करण्यासाठी आणि दर्जेदार करदाता सेवा देण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये सदर प्रशिक्षण सुनिश्चित  करते.  इंडक्शन प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना संपूर्ण भारतातील क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.


Tags: ७६व्या तुकडीचे प्रवेशपूर्व प्रशिक्षणgood newsGood news MorningIndian Revenue ServicenagpurPre-entry training of 76th batchनागपूरभारतीय महसूल सेवा
Previous Post

आता भारतातही ई-पासपोर्ट! परदेशात फिरणं होणार सोपं!!

Next Post

आदिवासी मंत्रालयाचा एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमासाठी अॅमेझॉनशी भागीदारी!

Next Post
Amazon Partnership

आदिवासी मंत्रालयाचा एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमासाठी अॅमेझॉनशी भागीदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!