मुक्तपीठ टीम
पुण्यातील कमांड रुग्णालयात ३० ऑगस्ट २०२२ रोजी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस नैन, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेवा पदकप्राप्त, एडीसी, यांच्या हस्ते १२० खाटांच्या दुर्धर रोगांवरील उपचार केंद्राचे (MDTC) उद्घाटन करण्यात आले.
हे केंद्र कमांड रुग्णालय संकुलाचा एक भाग आहे आणि डॉक्टर आणि निमवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समर्पित आणि अनुभवी चमूद्वारे कर्करोगाच्या रूग्णांना सर्वसमावेशक दर्जेदार सेवा देण्यासाठी समर्पित ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग आणि डे केअर सुविधेसह अत्याधुनिक सुविधांनी पूर्णपणे सुसज्ज आहे.
केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि रेडिएशनसह कर्करोगाच्या रुग्णांचे निदान, वर्कअप आणि उपचार एकाच ठिकाणी मिळणारे हे केंद्र आहे आणि त्यात दोन खाटांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट देखील समाविष्ट आहे. या नवीन सुविधेसह, कर्करोगाची काळजी आणि संशोधन नवीन उंची गाठेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांना अडचणीत मदत करेल.
पुण्याच्या कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र
पुण्याच्या याच कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र उभारण्यात आलं आहे. भारतात दरवर्षी जन्मलेल्या २७ दशलक्ष मुलांपैकी सुमारे १०% मुले कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाने, व्यंगामुळे किंवा विलंबाने होत असलेली प्रगती यामुळे ग्रस्त असतात त्यामुळे पुढील आयुष्यात त्यांना गंभीर अपंगत्व येते. यांसारख्या समस्यांचे लावकरात लवकर निदान झाल्यास आणि या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने थेरपिस्टच्या चमूने जलद उपचार सुरु केल्याने अपंगत्व कमी करण्याची एक अनोखी संधी प्राप्त होते आणि पिडीत मुलाला त्याची जास्तीत जास्त क्षमता साध्य करण्यासाठी मदत होते. या संकल्पनेतून , भारत सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके ) सुरू केला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जलद अपंगत्व निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन ) केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात अशा पहिल्या केंद्राचा नुकताच शुभारंभ झाला.
अधिक माहितीसाठी लिंक क्लिक करा आणि वाचा:
पुण्याच्या कमांड रुग्णालयात लहान मुलांसाठी जलद निदान आणि उपचार (अर्ली इंटरव्हेंशन) केंद्र