Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीच्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये सुधारणा, नऊ कोटींपर्यंत करदात्यांकडून वापर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
income tax

मुक्तपीठ टीम

प्राप्तिकर विभागाचे ई-फाइलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) ७ जून, २०२१ रोजी सुरू करण्यात आले.तेव्हापासून करदात्यांनी आणि व्यावसायिकांनी पोर्टलमध्ये आलेल्या समस्या आणि अडचणी नोंदवल्या आहेत. या प्रकल्पासाठी ठराविक सेवा प्रदाता असलेल्या इन्फोसिस लिमिटेडकडून करण्यात येत असलेल्या समस्यांच्या निवारणावर वित्तमंत्रालय नियमित देखरेख ठेवून आहे. आता मात्र या पोर्टलमध्ये चांगल्या सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे आता करदात्यांकडून पोर्टलचा वापर अधिकाधिक वाढत आहे.

आयटी पोर्टलचा वाढता वापर

  • अनेक तांत्रिक मुद्द्यांची उत्तरोत्तर दखल घेतली जात आहे आणि पोर्टलवरील विविध प्राप्तिकर संबंधित भरणा झालेल्या अर्जाच्या आकडेवारीमध्ये सकारात्मक कल दिसून आला आहे.
  • ७ सप्टेंबर, २०२१ पर्यंत ८.८३ कोटीहून अधिक आणि सप्टेंबर, २०२१ मध्ये दैनंदिन सरासरीनुसार १५.५५ लाखांपेक्षा अधिक विशेष करदात्यांनी लॉग इन केले.
  • सप्टेंबर, २०२१ मध्ये दररोज ३.२ लाख आणि मूल्यांकन वर्ष २०२१-२२ साठी १.१९ कोटी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल झाली.
  • त्यापैकी ७६.२ लाखांहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी ऑनलाइन पोर्टलचा उपयोग केला आहे.
  • केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राद्वारे प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या ९४.८८ लाखांहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रांची ई-पडताळणी देखील करण्यात आली आहे.
  • यापैकी ७.०७ लाख प्राप्तिकर विवरणपत्रांवर प्रक्रिया करण्यात आली आहे., हे उत्साहवर्धक आहे.
  • चेहरा विरहित मूल्यांकन /अपील/दंडात्मक कार्यवाही अंतर्गत विभागाने जारी केलेल्या ८.७४ लाख नोटिसा करदात्यांना पाहता येत आहेत, ज्याला २.६१ लाखांहून अधिक प्रतिसाद दाखल झाले आहेत.

ई-पोर्टलमाध्यमातून नोटिसाही!

  • ई-कार्यवाहीसाठी सरासरी ८,२८५ नोटिसा दिल्या जात आहेत आणि सप्टेंबर, २०२१ मध्ये दररोज ५,८८९ प्रतिसाद दाखल केले जात आहेत.
  • १०.६० लाखांहून अधिक वैधानिक अर्ज दाखल केले गेले आहेत ज्यात ७.८६ लाख टीडीएस स्टेटमेंट्स, ट्रस्ट/संस्थांच्या नोंदणीसाठी १० ए चे १.०३ लाख अर्ज , पगाराच्या थकबाकीसाठी १० ई 0.८७ लाख अर्ज , अपीलासाठी ०.१० लाख अर्ज ३५ यांचा समावेश आहे.
  • ६६.४४ लाख करदात्यांनी आधार- पॅन संलग्न केले आहे. आणि १४.५९ लाखांहून अधिक ई-पॅन वाटप करण्यात आले आहेत.
  • सप्टेंबर २०२१ मध्ये दररोज ०.५० लाखांहून अधिक करदात्यांकडून या दोन सुविधांचा लाभ घेतला जात आहे.

 

करदात्यांना सहजपणे अर्ज दाखल करता यावा यासाठी विभाग इन्फोसिसच्या सतत संपर्कात आहे याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे.


Tags: E-Filling Portalincome taxआयकर विभाग
Previous Post

आता व्हीआयपी आणि संरक्षण क्षेत्रासाठीही इलेक्ट्रिक वाहनं

Next Post

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये २३० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
NSRY

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये २३० जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!