Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता व्हीआयपी आणि संरक्षण क्षेत्रासाठीही इलेक्ट्रिक वाहनं

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Electric vehicles

मुक्तपीठ टीम

मुंबईतील नौदल पश्चिम कमांडने निवासी भागात वापरण्यासाठी पर्यावरणपूरक १९ नवीन बहुउद्देशीय इलेक्ट्रिक वाहने (EVs) कमांडमध्ये समाविष्ट केली आहेत. ही वाहने भरवशाची, उर्जा-कार्यक्षम आणि कमी देखभाल लागणाऱ्या बॅटरीने सुसज्ज आहेत. याआधी गेल्या आठवड्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही महापालिकेसाठी इलेक्ट्रिक कार ण्यात आली. त्यामुळे आता महत्वाच्या व्यक्तींच्या पर्यावरणपूरक प्रवासातून प्रेरणा घेऊन सामान्यांमध्येही ई-वाहनांचं आकर्षण वाढण्यास मदत मिळू शकेल.

 

०८ सप्टेंबर २१ रोजी, पश्चिम विभागाच्या नेव्ही वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या (एनडब्ल्यूडब्ल्यूए) अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार यांनी या इलेक्ट्रिकल वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. या इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर नौदल कर्मचारी आणि निवासी भागात मालाच्या वाहतुकीसाठी केला जाईल.

 

वर्ष २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषणकारी घटक २०-३०% कमी करण्यासाठी भारत सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

या वाहनांचा समावेश भारतीय नौदलाच्या विविध हरित उपक्रमांपैकी एक आहे.ही वाहने वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील आणि पर्यावरण संरक्षणाला मदत करतील.

मुंबईच्या महापौरांनाही ईलेक्ट्रिक कार

पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याचा संदेश सामान्य मुंबईकरांना देण्याच्या हेतूने मुंबई महानगरपालिकेने पाच इलेक्ट्रिक कार घेतल्या आहेत. मनपाच्या ताफ्यातील या ई-कारपैकी एक ई-कार परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार यादव यांच्या हस्ते महापौर किशोरी पेडणेकर यांना महापौर निवासस्थानी सोपवण्यात आले. याप्रसंगी उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) (परिवहन) सुनील सरदार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी उपस्थित होते.

 

मुंबई मनपाच्या ताफ्यात प्रथमच पाच ई-वाहनं

  • मुंबई महानगरपालिकेकडे असणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात सध्या ९६६ वाहने आहेत.
  • या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांप्रमाणेच सीएनजी सारख्या पर्यावरणपूरक इंधनांचा वापर करणाऱ्या वाहनांचाही समावेश आहे.
  • मनपाच्या वाहन ताफ्यामध्ये आता पाच इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.
  • टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सझेड प्लस’या पाच ई-कार या केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून ‘ड्राय-लीज’ पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत.
  • सदर वाहनांसाठी दरमहा रुपये २७ हजार इतका खर्च असणार असून यामध्ये देखभाल व दुरुस्तीचाही समावेश आहे.
  • या ई-कार साधारणपणे पुढील ८ वर्षे महापालिकेच्या सेवेत असणार आहेत.

Tags: My BMCमुंबई मनपा
Previous Post

महाराष्ट्रातील ग्रामीण रस्ते बांधकामासाठी आशियायी विकास बँकेचे ३०० दशलक्ष डॉलर्स

Next Post

आयटीच्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये सुधारणा, नऊ कोटींपर्यंत करदात्यांकडून वापर

Next Post
income tax

आयटीच्या ई-फाइलिंग पोर्टलमध्ये सुधारणा, नऊ कोटींपर्यंत करदात्यांकडून वापर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!