मुक्तपीठ टीम
कस्टम म्हणजेच सीमाशुल्क विभागाने तस्करीचं एक वेगळंच रॅकेट उघडकीस आणलं आहे. हे रॅकेट कर चुकवण्यासाठी महागडे गॅजेट, सिगरेट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू नेहमीच्या वितरकांऐवजी टपालानं मागवत होते. सीमाशुल्क विभागानं अशा १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त केल्या आहेत.
सीमाशुल्क विभागानं आय-फोन, ड्रोन, ऍपल घड्याळे आणि सिगारेट्स या वस्तू जप्त केल्या आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करताना, बॅलर्ड इस्टेट कार्यालयातील शोध आणि गुप्तवार्ता विभागाने खालील ठिकाणी एकत्रितपणे तस्करीविरोधी कारवाई केली.
1) एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी, फॉरेन पोस्ट ऑफिस
2) विदेश डाक भवन, बॅलार्ड इस्टेट मुंबई
3) एअर पार्सल सॉर्टींग ऑफिस, विलेपार्ले (पू ), मुंबई.
कार्यालयाने चकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी येथून 12 , विदेश डाक कार्यालय , बल्लार्ड इस्टेट मुंबई येथून 26 आणि मुंबईतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस, विलेपार्ले (पू ), इथून 5 कन्साईनमेंट ताब्यात घेतल्या.
टपालानं तस्करी केलेल्या वस्तू
- 1470 आय फोन
- 322 ऍपल घड्याळे
- 64 ड्रोन्स
- 41 एअर पॉड
- 1 391 सिगारेट स्लीव्ह
- 36 ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे ,
बाजार मूल्य 15 कोटी रुपये आहे.
या वस्तूवर लागू होणारे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर टाळण्यासाठी वस्तूंची माहिती मूल्य आणि प्रमाण याबाबत चुकीची माहिती देऊन टपालाद्वारे या वस्तू पाठवण्याचा प्रयत्न केला गेला. तपासात वरील कन्साईन्मेंटची नावे व पत्ते बनावट असल्याचे आढळले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.