Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकरी आंदोलन ‘टूलकिट’ प्रकरणी पोलिसांचीच ‘दिशा’ चुकली!

"अपुरे पुरावे, अटकेसाठी पुरेसे नव्हते!"

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
disha ravi toolkit

मुक्तपीठ टीम 

शेतकरी आंदोलनात टूलकिट प्रकरणी पोलिसांनी सादर केलेले पुरावे अपुरे असल्याने २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तिची एक दिवसाची पोलीस कोठडी संपण्यापूर्वीच तिला पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशाला जामीन मंजूर केला आणि पुरावे पुरेसे नसतानाही अटक केल्याबद्दल पोलिसांना फटकारले.

“केवळ सरकारच्या धोरणांशी असहमत असल्यामुळेच एखाद्याला तुरूंगात टाकू शकत नाही,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दिशाला जामीन मंजूर केला. १८ पानी आदेशात न्यायाधीश राणा यांनी पोलिसांनी सादर केलेले पुरावे “अस्पष्ट आणि अपूरे” असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या काही तासांनी मंगळवारी रात्री तिहार तुरूंगातून सोडण्यात आले.

दिशाला दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथून अटक केली होती. भारत सरकारविरूद्ध सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक युद्ध करण्यासाठी “टूलकिट” तयार करण्याच्या आरोपाखाली खलिस्तान समर्थकांविरूद्ध सायबर सेलने एफआयआर नोंदविला. त्या खलिस्तान समर्थक आरोपींशी दिशाचे थेट संबंध असल्याचे कुठलेही पुरावे दिसत नाहीत. प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा ‘पोएटिक जस्टिस फोरम’ म्हणजेच ‘पीजेएफ’ किंवा दिशा यांच्याशी संबंध असल्याचा कोणताच पुरावा नाही. तसेच प्रतिबंधित ‘शिख्स फॉर जस्टीस’ या संघटनेशीही तिचा संबंध असल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने दिशाला जामीन मंजूर करत तपास यंत्रणांना आवश्यक असेल तेव्हा सहकार्य करण्याचे निर्देशही दिले.

 

न्यायालयाने आठवण करून दिली असमहतीच्या अधिकाराची…

  • “लोकशाही देशात नागरिक हे सरकारच्या विवेकाचे रक्षण करणारे असतात. त्यामुळे सरकारच्या धोरणांशी असहमत असल्यामुळे त्यांना तुरूंगात टाकू शकत नाही.”
  • “घटनेतील कलम १९ मध्ये असहमतीचा अधिकार अंतर्भूत आहे.”
  • “मतभेद, निषेध, असहमती, अगदी एखाद्या खटल्याविषयी नापसंती ही सरकारी धोरणांमध्ये निष्पक्षता निश्चित करण्यासाठीची वैध साधने आहेत.”
  • “जागरूक आणि प्रयत्नशील नागरिक हे निर्विवाद आणि शांत नागरिकांच्या तुलनेत निरोगी आणि दोलायमान लोकशाहीचे लक्षण आहेत.”
  • “संपर्काला कोणतीही भौगोलिक बंधने असू शकत नाहीत. टूलकीट संपादन, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करणे हा गुन्हा नाही.”
  • “या प्रकरणात आणखी अनुकूल पुरावे मिळण्याच्या अपेक्षेने एखाद्याच्या स्वातंत्र्यावर अमर्याद निर्बंध आणण्याची परवानगी तपास यंत्रणांना देता येणार नाही.”

 

दिशाच्या पालकांना दिलासा मिळाला आहे आणि खूप आनंद झाला आहे आणि ते मुलगी घरी परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. जामीन मिळवून कायदेशीर व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास दृढ झाला असल्याचे ते म्हणाले.

 

न्यायालयाचे आदेश

  • न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास अधिकाऱ्याने समन्स बजावले तर दिशा तपासात सहकार्य करतच राहील.
  • न्यायालयाच्या परवानगीशिवाय ती देश सोडणार नाही.
  • खटल्याच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा किंवा विलंब होऊ नये म्हणून ती कार्यवाहीच्या प्रत्येक टप्प्यावर संबंधित न्यायालयासमोर हजर होईल.

Tags: disha raviटूलकिटदिशा रवीशेतकरी आंदोलन
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

मुंबईत टपालानं तस्करी…कस्टमकडून १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त!

Next Post
smuggling by post

मुंबईत टपालानं तस्करी...कस्टमकडून १५ कोटी रुपयांच्या इम्पोर्टेड वस्तू जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!