Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढे काय? जाणून घ्या…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
income tax

मुक्तपीठ टीम

आयटीआरचा अर्थ इनकम टॅक्स रिर्टन असा आहे. हे फाईल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. आयटीआर नेहमी आर्थिक वर्ष म्हणजेच ‘१ एप्रिल ते ३१ मार्च’ या कालावधीसाठीच भरला जातो. २०२१-२२ या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलैच्या अंतिम मुदतीत आयकर विभागाने कोणताही बदल केलेला नाही. आयकर पोर्टलबाबत सोशल मीडियावर तक्रारी करूनही विभागाने मुदतवाढ दिली नाही.

अशा परिस्थितीत ज्यांनी १ ऑगस्टपर्यंत आयकर रिटर्न भरले नाहीत, त्यांचे काय होणार? आयकर विभाग त्यांच्यावर कोणती कारवाई करणार किंवा त्यांना कर भरण्याची संधी दिली जाणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • सरकारच्या नियमांनुसार, जे करदाते ३१ जुलैपर्यंत रिटर्न भरू शकले नाहीत, त्यांना आयकर भरण्याची संधी आहे. ३१ डिसेंबरपर्यंत लोक आयकर भरू शकतात.
  • मुदत संपल्यानंतर लोकांना त्यासाठी दंड भरावा लागणार आहे.
  • १९६१ च्या आयकर कायद्यानुसार, ३१ जुलैनंतर कर भरणाऱ्यांना कलम २३४ए अंतर्गत व्याजासह आयकर भरावा लागेल.

३१ जुलैनंतर आयकर भरणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार

  • ३१ जुलैनंतर कर भरणाऱ्यांना दंडासह रिटर्न भरण्याची संधी मिळेल.
  • वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी दंडाची रक्कम वेगवेगळी असेल.
  • ज्यांचे वार्षिक वेतन ५ लाखांपर्यंत आहे ते ३१ डिसेंबरपर्यंत १ हजार रुपयांच्या दंडासह रिटर्न भरू शकतात.
  • ज्यांचे वार्षिक वेतन ५ लाखांपेक्षा जास्त आहे ते ५ हजार रुपयांच्या दंडासह रिटर्न भरू शकतात.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न सवलत मर्यादेपेक्षा कमी आहे त्यांना कर विवरणपत्र भरण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही.

३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न नाही भरल्यास काय होईल?

जर करदात्यांनी ३१ डिसेंबरची आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत चुकवली, तर त्यांना त्यांच्या प्रभागातील आयकर आयुक्तांसमोर माफीसाठी अपील दाखल करावे लागेल. त्यानंतरच त्यांना परतावा किंवा नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी विभागाने ‘आयटीआर यू’ फॉर्म आणला आहे, ज्यामध्ये ग्राहक अपडेटसह रिटर्न दाखल करू शकतात. यामध्ये त्याला उत्पन्नावरील आयटीआर उशिरा जमा करण्याचे कारणही स्पष्ट करावे लागणार आहे.

 

पाहा व्हिडिओ:


Tags: good newsincome tax returnitrITR Deadlinemuktpeethuseful newsआयटीआरआयटीआर अंतिम मुदतइनकम टॅक्स रिर्टनउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

अटलांटिक महासागरात भारतीय आणि फ्रांस नौदलाचा सराव

Next Post

Google Maps: आता भारतातील रस्त्यांचे खरे फोटो गुगल मॅपवर दिसणार!!

Next Post
Google Maps

Google Maps: आता भारतातील रस्त्यांचे खरे फोटो गुगल मॅपवर दिसणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!