मुक्तपीठ टीम
गुगल क्रोम वापरणाऱ्या यूजर्ससाठी भारत सरकारने एक महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. जर त्या सूचनेचं पालन केलं नाही तर यूजर्सवर सायबर संकट ओढवू शकण्याची भीती आहे. आयटी मंत्रालयाच्या इंडियन काँप्युटर इमर्जं रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोम वापरणाऱ्या यूजर्स वर्गाला सावध केले आहे. सरकार देत असलेला इशारा प्रामुख्याने त्या गुगल क्रोम यूजर्ससाठी आहे जे गुगल क्रोम वर्जन ९९.०.४८४४.७४ किंवा त्याआगोदरचा ब्राउजर वापरत आहेत.
काय आहे नेमका अलर्ट?
- सीईआरटी-आयएनने वॉर्निंग देताना सांगितले की, गुगलक्रोम मधील अनेक कमतरता आम्ही ओळखल्या आहेत.
- ज्यामुळे गुगल क्रोमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सारखे मोबाइल,टॅबलेट आणि लॅपटॉपवर सायबर हल्ले होऊ शकतात.
- यापद्धतीने हॅकर्स,हल्ल्यात कोडचा वापर करून रिमोटली काँप्यूटर,मोबाईल किंवा अन्य काही असलेल्या गॅजेटचे अॅक्सेस बळकावू शकतात.
- अशापद्धतीची सिक्यूरिटी रिस्क ही खूप मोठी असते.
- कारण हॅकर्ससाठी जुने वर्जन असणाऱ्या गुगल क्रोम ब्राउजरमध्ये घुसखोरी करणे हे सोपे होऊन जाते.
गुगल क्रोममधील कमतरतेबाबत
- गुगल क्रोममधील जुन्या वर्जनमध्ये अनेक पद्धतीच्या सिक्यूरिटी लॅप्सेस आहेत.
- सरकारनेने जारी केलेल्या अॅडवायजरीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, गुगल क्रोम ब्राउजरमध्ये ब्लिंक लेआउट, एक्सटेंशन, सेफ ब्राउजिंग, स्प्लिट स्क्रिन, अॅंगल, न्यू टॅप पेज, ब्राउजर यूआय आणि जीपीयू मध्ये हीप बफर ओवरफ्लो असल्या कारणाने यूजर्स असुरक्षित आहे.
- भारत सरकारच्या सीईआरटीने सांगितले की, यूजर्सने गुगल क्रोमचे ९९.०.४८४४.७४ हे वर्जन लवकर अपडेट करून घ्यावे.
जगातील सर्वात लोकप्रिय ब्राउजिंग अॅप
- गुगल क्रोम हे जगभरात सर्वात पॉपुलर असलेले ब्राउजर आहे.
- जगभरात ६५.३८ टक्के नेटकरी गुगल क्रोम वापरतात.
- त्यानंतर ९.५ टक्के मार्केट शेयर सोबत मायक्रोसॉफ्ट एजचा नंबर येतो.