मुक्तपीठ टीम
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या महिन्यात जसं सांगितलं तसं झालं आहे. आयसीसीच्या आगामी फ्युचर टूर प्रोग्राम (FTP)मध्ये आयपीएलसाठी खास अडीच महिन्यांची तरतूद असेल. आयसीसीच्या FTPमध्ये अडीच महिन्यांच्या आयपीएल कालावधीत कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जगभरातील नामवंत क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतील. क्रिकेट जाणकारांच्या मते, आयपीएलमधून मिळणारा पैसा हा सर्वांनाच हवाहवासा आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या प्रवाहात अडथळे आणण्याचा कुणीही प्रयत्न करत नाहीत.
आयपीएलमध्ये आता १० संघ
- आयपीएलमध्ये आठ संघांचे ६० सामने असायचे.
- आता गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा समावेश झाल्यानंतर यावेळी १० संघांच्या आयपीएलमध्ये एकूण ७४ सामने खेळवले गेले.
- भविष्यात सामन्यांची संख्या ८४ आणि नंतर ९४ होतील.
अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी
- आयसीसी एफटीपीमध्ये आयपीएलच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत इतर सामने नाहीत.
- त्यामुळे पाकलव्यतिरिक्त सर्व सर्वोच्च आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात.
- आयसीसीच्या ड्राफ्टमध्ये आयपीएलसाठी आणखी दोन आठवडे शिल्लक आहेत.
- आयपीएल सामने पूर्वी मार्चच्या अखेरीपासून मे अखेरपर्यंत चालत असे, मात्र आता दोन आठवडे वाढवून ती जूनपर्यंत चालणार आहे.
पाकिस्तानचा जळफळाट
- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबीचा जळफळाट झाला आहे.
- त्याला कारण आहे, आयपीएलमध्ये पाकिस्ताना खेळाडूंवर बंदी आहे.
- आयपीएल विदेशी खेळाडूंना सर्वाधिक रक्कम देते.
- पाकिस्तानी क्रिकेटर मात्र, त्यापासून वंचित राहतात, ते फक्त टीव्हीवर आयपीएल पाहू शकतात.
- खेळाडूंच्या पगाराच्या १० टक्के रक्कम त्यांच्या संबंधित मंडळाला मिळतात.
- त्यातून इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांना जसा लाभ होतो, तसा आर्थिक संकटातील पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला पीसीबीला होत नाही.