मुक्तपीठ टीम
आज रंगपंचमी प्रत्येकाचा आवडता सण. रंगांची उधळण करत देशात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. दरम्यान रंगांचा सण असलेल्या रंगपंचमीत मजा करा पण काळजीही घ्या. आपण कोणते रंग वापरत आहोत ते त्वचेसाठी हानिकार तर नाही ना याची काळजी घ्या. कारण डॉक्टरांच्या मते, अनेक रंग ही रासायनिक असतात. त्यामुळेच चेहऱ्यावर फक्त हर्बल किंवा सेंद्रिय रंगाचा वापर करावा. त्यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. रासायनिक रंग वापरू नयेत.
सिंथेटिक रंगांचा वापर टाळा
- सिंथेटिक रंग वापरण्याचे अनेक तोटे आहेत.
- गुलाल आणि इतर रंग बहुतेक केमिकल्सपासून बनवले जातात, जे त्वचेसाठी हानिकारक असतात.
- यामुळे त्वचेची जळजळ, ऍलर्जी, पुरळ आणि रंग बदलू शकतात.
- काहीवेळा गंभीर जळजळ होण्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. रसायनांमुळे त्याचा परिणाम डोळ्यांवर आणि केसांवरही दिसून येतो.
रंग लावताना या गोष्टींची काळजी घ्या-
- अंगावरील रंग निघून जाण्यासाठी जास्त चोळू नका, चोळल्यानंतर काही वेळाने खाज सुटू शकते किंवा जळजळ होऊ शकते.
- रंग खेळण्याआधी तेल लावू नका, त्यामुळे रंगांमुळे होणारे नुकसान वाचते, पण तेल जमा झाल्याने खूप नुकसान होऊ शकते.
- बरेच लोक जास्त रंग किंवा पॉलिशचा वापरतात जे सहजपणे निघत नाहीत. रंग काढताना, काहीवेळा केसांचा संरक्षक थर निघून जातो, ज्यामुळे केसांचे नुकसान देखील होऊ शकते.
- ऑइल पेंट वापरणे टाळा, हा रंग डोळ्यात आणि कानात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- डोळ्यात रंग गेल्यानंतर सतत स्वच्छ पाण्याने डोळे धुत रहा.
- होळी खेळताना कोरोना मार्गदर्शक नियमांचे पालन करा.