मुक्तपीठ टीम
मुल जन्मताच आता आधार कार्ड मिळू शकणार आहे. आधार कार्डची व्यवस्था पाहणारे UIDAI हे प्राधिकरण त्यासाठी तयारी करत आहे. ही तयारी पूर्ण झाली की लवकरच मुलाचा जन्म होताच, त्या रुग्णालयांमध्येच नवजात बालकांना आधार कार्ड जारी केले जाईल. यासाठी लवकरच रुग्णालयांमध्ये नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. एक प्रकारे भारतात नवजातांचा जन्म दाखला मिळण्यापूर्वीच त्यांच्या नावावरील आधारकार्ड जारी झालेले असेल. याचबरोबर लहान मुलांसाठी आधार जारी करण्याची प्रक्रियाही आता सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ दोन कागदपत्रांच्या आधारे त्यांच्यासाठी बाल आधार कार्ड मिळवणे आता शक्य आहे.
जन्म होताच आधार कार्ड!
- UIDAI नवजात बालकांना आधार क्रमांक देण्यासाठी जन्म निबंधकांशी करार करण्याचा प्रयत्न करत आहे.
- देशातील ९९.७०% प्रौढ लोकसंख्येला आधारशी जोडण्यात आले आहे.
- या अंतर्गत आतापर्यंत देशातील १३१ कोटी लोकसंख्येची नोंदणी झाली आहे. आता नवजात बालकांची नोंदणी करण्याचा प्रयत्न आहे.
कशी असणार नवजातांसाठी आधारची प्रक्रिया?
- दरवर्षी दोन ते अडीच कोटी मुले जन्माला येतात.
- आधार त्या नवजातांचीही आधार नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
- मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या/तिच्या फोटोवर क्लिक करून आधार कार्ड दिले जाईल.
- आधारसाठी ५ वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाहीत, ते त्यांच्या पालकांपैकी एकाशी जोडण्यात येते.
- वयाची ५ वर्षे ओलांडल्यानंतर मुलाचे बायोमेट्रिक्स घेतले जाणार आहेत.
आपल्या देशात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. कोणत्याही सरकारी किंवा इतर कामांसाठी आधार कार्ड लागतेच लागते. कोणत्याही भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड आता काही प्रमाणात मुलांसाठीही आवश्यक झाले आहे. त्यात आनंदाची बाब अशी की, मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज नसते.
लहान मुलांसाठी कसे बनवायचे आधार कार्ड?
- बाल आधार फक्त दोन कागदपत्रांसह तयार करता जाते.
- अगदी जन्माचा दाखला बनवण्याची गरज नाही.
- हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप किंवा शाळेच्या ओळखपत्रातूनही आधार बनवता येते.
- बाल आधारबाबत UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार मुलांचे आधार फक्त २ कागदपत्रांच्या मदतीने बनवता येते.
- या कागदपत्रांमध्ये, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, मुलांच्या रुग्णालयाची डिस्चार्ज स्लिप किंवा मुलांचे शाळेचे ओळखपत्र यांचा समावेश आहे.
- निळ्या रंगाचे आधार कार्ड पाच वर्षांखालील मुलांसाठी जारी केले जाते. हे ऑनलाइन देखील सहज करता येते.
- जन्म प्रमाणपत्र नसल्यास, पालकांना डिस्चार्ज स्लिपमधून पाच वर्षांखालील मुलाचे आधार कार्ड मिळू शकते.
- मात्र यासाठी आई किंवा वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक असेल.
- यूआयडीएआयच्या नियमांनुसार, पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डसाठी बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन घेतले जात नाहीत.
- जेव्हा मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा त्यांचे बायोमेट्रिक अपडेट करावे लागेल.
बाल आधार कार्ड अशा प्रकारे ऑनलाइन बनवता येते
१. सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट UIDAI.gov.in वर जा.
२. त्यानंतर आधार कार्ड रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
३. विचारलेली माहिती बरोबर भरा.
४. आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्हाला फॉर्मसह आधार केंद्रावर जावे लागेल.
५. आधार केंद्रावर तुम्हाला तारीख दिली जाईल.
६. दिलेल्या तारखेला, सर्व आवश्यक कागदपत्रे घ्या आणि आधार केंद्रावर जा.