Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रीय गोकुळ मिशनमध्ये पशुधन कृत्रिम रेतन व इतर प्रशिक्षणासाठी संधी

December 17, 2021
in उपयोगी बातम्या, करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
राष्ट्रीय गोकुळ मिशन

मुक्तपीठ टीम

राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री (Multipurpose Artificial Insemination Worker In Rural India) म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे. अशा प्रशिक्षित व्यक्तींची पशुधनामध्ये कृत्रिम रेतन व इतर अनुषंगिक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. यामुळे ग्रामीण गायी व म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दुध उत्पादनात भरीव वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. तरी प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत. सांगली जिल्ह्यातही ही योजना असून स्थानिक तरुणांनी त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते व जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम. पराग यांनी केले आहे.

 

प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिन्यांच्या कालावधीचा असून यामध्ये १ महिना क्लासरूम प्रशिक्षण व २ महिन्यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण राहणार आहे. क्लासरूम प्रशिक्षण क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे व प्रात्यक्षिक प्रशिक्षण जिल्ह्यातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

 

अर्जदार हा किमान १२ वी उत्तीर्ण झालेला असावा व त्याचे वय १८ ते ३५ वर्ष असावे. अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती यांच्या कार्यालयात उपलब्ध होईल. सांगली जिल्ह्यामधून सर्वसाधारण प्रवर्गातून ८ व अनुसूचित जाती प्रवर्गातून १ याप्रमाणे ९ उमेदवारांची निवड सदर प्रशिक्षणासाठी करण्यात येणार असल्याचे डॉ. धकाते यांनी सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Dr. K. M. ParagDr. S. A. Dhakatemaitri trainingMultipurpose Artificial Insemination Worker In Rural IndiaNational Gokul Missionडॉ. एस. ए. धकातेडॉ. के. एम. परागमैत्री प्रशिक्षणराष्ट्रीय गोकुळ मिशन
Previous Post

‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा लाभ! भारतात सात लाखांहून अधिक नव्या कंपन्या!!

Next Post

आता मुलं जन्मताच आधार कार्ड! लहान मुलांसाठी आधार कार्ड मिळवणे अगदीच सोपे! जाणून घ्या कसं मिळवायचं…

Next Post
Bal Aadhar Card -1

आता मुलं जन्मताच आधार कार्ड! लहान मुलांसाठी आधार कार्ड मिळवणे अगदीच सोपे! जाणून घ्या कसं मिळवायचं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!