मुक्तपीठ टीम
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आता आयकर रिटर्नस भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2021 पासून 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. हे फॉर्म आणि रिटर्नस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्याची मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी, 25 जूनच्या अधिसूचनेनुसार, रक्कम भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असल्याचे सांगितले होते. या व्यतिरिक्त, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर कंपनी इन्फोसिसला आयकर विभागाच्या नवीन ई-फाइलिंग पोर्टलमध्ये करदात्यांना येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे.
कोणत्या आहेत आयटीआर रिटर्न भरण्याच्या ऑनलाइन पद्धती?
- प्रथम आयटीआरच्या अधिकृत पोर्टलला https://www.incometax.gov.in/iec/foportal/ भेट द्या.
- इन्कम टॅक्स रिटर्न वर टॅप करा आणि नंतर ‘फाइल इन्कम टॅक्स रिटर्न’ वर क्लिक करा.
- मूल्यांकन वर्ष पर्याय निवडा.
- आयटीआर भरण्यासाठी मोड निवडा आणि पुढे जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.
- स्टार्ट फाइलिंग नवीन आयटीआर वर क्लिक करा.
- तुम्हाला दाखल करायचा असलेला आयटीआर प्रकार निवडा.
- तुम्हाला आयटीआर का हवे आहे याचे कारण निवडा आणि आवश्यक असलेली माहिती भरा.
- लागू असल्यास पेमेंट करा.
- फॉर्म पूर्णपणे पडताळल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.