मुक्तपीठ टीम
आधार कार्ड भारतीयांचे सर्वात महत्वाचे ओळखपत्र आहे. आधार ओळखपत्र हे सर्व सरकारी आणि गैर सरकारी कामांसाठी अनिवार्य आहे. त्यामुळेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) कडुन ऑनलाईन आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा लवकरच सूरू करण्यात येणार आहे. यासाठी एक लिंक सुरू करण्यात येणार आहे. यूआयडीएआयने आपल्या ट्विटमध्ये या गोष्टीची माहिती दिली आहे. या लिंकच्या माध्यमातुन सहजतेने स्वतःचा किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड डाउनलोड करू शकता.
यूआयडीएआय ने आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी https://eaadhaar.uidai.gov.in ही लिंक शेअर केली आहे. लिंकवर क्लिक करून निर्देशाचे पालन केले तर ऑनलाईन आधार कार्ड मिळवणे सोप्पे आहे.
आधारकार्ड डाउनलोड करण्याच्या पायऱ्या
- यूआईडीएआईची लिंक eaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा.
- १२ नंबर चा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
- सुरक्षा कोड या कॅप्चा प्रविष्ट करा, त्यानंतर ओटीपी वाले पर्यायावर क्लिक करा.
- यांनातर मोबाइल नंबर वर ओटीपी येईल.
- मोबलाइल वर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- आधार कार्डची माहिती द्या.
- डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
युएएनशी लिंक करणे आवश्यक
- युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
- युएएनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२१ आहे.
- जर मुदतीपूर्वी युएएनला आधारशी लिंक केले नाही तर १ डिसेंबर २०२१ पासून अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- यामुळे पगाराचा मासिक भाग ईपीएफ खात्यात टाकता येणार नाही.
- प्रोविडंट फंडमधुन पैसे काढतानाही अडचणींना सामोरे जावे लागेल.